शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स तपासादरम्यान रिया चक्रवर्तीनं केला मोठ्या व्यक्तीचा उल्लेख; नाव घेण्यास NCB चा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 09:55 IST

रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आता NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावलं होतं. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यावेळी ती अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. रविवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने रियाची चौकशी केली.

रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली. ड्रग्स विक्रेता बासिद परिहारला पाच वेळा भेटले. सिनेमाच्या शुटींगदरम्यान त्याची भेट झाली. सुशांत नैराश्येत होता. शुटींगवेळी तो ड्रग्स घेत होता असं रियाने सांगितले. त्याचसोबत रियाने या चौकशीत एका मोठ्या व्यक्तीचं नाव घेतले पण एनसीबीने या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला.

सुशांत पूर्णपणे ड्रग्सच्या आहारी गेला होता, युरोप दौऱ्यावर असतानाही केवळ ड्रग्स मिळत नसल्याने तो युरोपवरुन परतला होता. सुशांतच्या फार्म हाऊसवर नेहमी पार्ट्या होत असे. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारमंडळी येत असले. सर्वजण ड्रग्सचं सेवन करत असं रियाने म्हटलं आहे.

रियाचा भाऊ शौविक आणि मिरांडालाही अटक

शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास सुशांतची गर्लफ्रेंड रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यानंतर शौविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे.

रियाचा इशारा

रिया चक्रवर्ती आणि स्मिता पारीख यांच्यात व्हॉट्सअपवरुन संभाषण झालं होतं. यात रियाने स्मिताला मेसेज केरुन सांगितलं होतं की, मला जर अटक झाली तर मी अडकेनच पण तुम्हा सर्वांनाही मी अडकवेन असा इशारा तिने दिला होता. स्मिता पारीख ही सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्यांपैकी एक आहे.   

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDrugsअमली पदार्थ