शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गडचिराेलीत आत्महत्या, पतीपत्नी हाेते नक्षल दलममध्ये सक्रीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 00:01 IST

Gadchiroli News: दाेन वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी नवेगाव येथील आत्मसमर्पितांच्या वसाहतीत घडली. 

गडचिराेली - दाेन वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी नवेगाव येथील आत्मसमर्पितांच्या वसाहतीत घडली. नकुल मट्टामी (वय ३५, रा. राजनांदगाव) असे मृतकाचे नाव आहे. ताे व त्याची पत्नी दाेघेही नक्षल दलममध्ये कार्यरत हाेते. २०१९ मध्ये दाेघांनीही गडचिराेली पाेलिसांसमाेर आत्मसमर्पण केले हाेते. हे जाेडपे गडचिराेली शहराजवळ असलेल्या नवेगाव येथील आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी बांधून दिलेल्या ‘नवजीवन’ वसाहतीमधील घरी राहत हाेते.

मंगळवारी वसाहतीजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत नकूल मट्टामीला तीन मुले आहेत. काैटुंबिक कारणातून मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

नवजीवन वसाहतीत सर्व आत्मसमर्पित नक्षलवादी राहतात. त्यांना उपजीविकेचे नवीन साधन मिळावे म्हणून पाेलीस विभागाच्या वतीने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातून अनेकांनी स्वयंराेजगार सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली