शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, १२ लाखांचे होते इनाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 10:02 IST

१२ लाखांचे इनाम, दोघेही होते एरिया कमिटी मेंबर पदावर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नक्षल्यांच्या टेक्निकल टीममध्ये कार्यरत असलेल्या ६३ वर्षीय नक्षलीसह एका ३४ वर्षीय महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. हे दोघेही वेगवेगळ्या दलममध्ये एरिया कमिटी मेंबर पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर प्रत्येकी ६ लाखांचे इनाम होते.  रामसिंग ऊर्फ सीताराम बक्का आत्राम आणि माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजू मट्टामी अशी त्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांनी पांढरा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या दोघांनाही पुनर्वसनाकरिता प्रत्येकी ४.५ लाख रुपये रोख, घरकुल आणि रोजगारासाठी मदत केली जाणार आहे.   

गंभीर गुन्ह्यात होता सहभाग      रामसिंग हा मूळचा अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी आहे. मार्च २००५ ला तो अहेरी दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर पेरमिली दलम आणि २०१२  ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरिया टेक्निकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर एक खून, एक चकमक व इतर १, असे

३ गुन्हे आहेत.  माधुरी ऊर्फ भुरी ही एटापल्ली तालुक्यातील गट्टेपल्ली येथील मूळची रहिवासी आहे. नोव्हेंबर २००२ ला ती कसनसूर दलममध्ये भरती झाली. त्यानंतर भामरागड दलम आणि फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिच्यावर खुनाचे ४ गुन्हे, चकमकीचे २१, जाळपोळीचे ७ आणि इतर ५, असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. 

... म्हणून आत्मसमर्पणाकडे वाढला कल     शासनाची आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत झालेला नक्षलींचा खात्मा, तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक जहाल माओवादी आत्मसमर्पणाच्या वाटेवर आले आहेत.  - अंकित गोयल, पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी