शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

2 वर्षे ना सुनावणी ना सुटका, तुरुंगातच दिला बाळाला जन्म; जाणून घ्या प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 19:30 IST

महिलेला अटक केली तेव्हा ती गर्भवती होती, यानंतर तिने तुरुंगातच मुलाला जन्म दिला. दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणीच झाली नाही.

नवी दिल्ली : मेघालयातील एका महिलेला मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तिला दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. यादरम्यान तिने तुरुंगात मुलाला जन्म दिला. सर्वोच्च न्यायालयाने आता या महिलेला जामीन मंजूर केला आहे. तिच्यावर कोणताही खटला सुरू होऊ शकत नाही आणि त्यामुळेच तिला जास्त काळ तुरुंगात ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने मानवी तस्करीचा आरोप असलेल्या 21 वर्षीय महिला द्रभामोन पाहवा हिला जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण ?मेघालयतील रहिवासी असलेली द्रभामोन पाहवा ही मानवी तस्करीच्या आरोपाखाली फेब्रुवारी 2020 पासून तुरुंगात आहे. या महिलेला अटक केली तेव्हा ती गर्भवती होती. यानंतर तिने तुरुंगातच मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे, दोन वर्षे या प्रकरणाची सुनावणी झाली नाही.

न्यायालयाने काय म्हटले ?आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, पक्षकारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर असे दिसून आले की याचिकाकर्त्याला 18 महिने तुरुंगात राहावे लागले. यादरम्यान तिने बाळाला जन्मही दिला. एक मूल आहे, म्हणून आम्ही तिला जामीन देऊ शकतो. हा देण्याचा योग्य आधार विचारात घ्या.

महिलेला वेश्याव्यवसायात ढकललेवकील सलमान खुर्शीद आणि टीके नायक या महिलेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर होते. यावेळी ते म्हणाले की, महिलेला चांगली नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने दिल्लीत आणण्यात आले होते. त्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. ही महिला स्वत:च वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीची बळी ठरली आहे.

सर्वोच्च न्यायालयाला असेही सांगण्यात आले की, 18 महिन्यांच्या तुरुंगवासात या महिलेने तुरुंगात एका मुलाला जन्म दिला आणि ते मूलही तिच्या आईसोबत तुरुंगात आहे. या प्रकरणात दिल्ली सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी हजेरी लावत महिलेवरील कथित गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेऊन तिच्या याचिकेला विरोध केला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय