शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

शिवसेना नगरसेवकाच्या बर्थडेनंतर समर्थकाचा गोळीबार; दोन गटांत झाली हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 00:39 IST

गुन्हा दाखल, मंगळवारी रात्री १२ वाजता गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चक्कीनाका परिसरात असलेल्या कार्यालयात शेकडो समर्थक जमले होते.

कल्याण : पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांचा वाढदिवस साजरा झाल्यावर दोन गटांत हाणामारी होऊन गोळीबार झाल्याची घटना घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिले.

मंगळवारी रात्री १२ वाजता गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चक्कीनाका परिसरात असलेल्या कार्यालयात शेकडो समर्थक जमले होते. गवळी यांचा वाढदिवस गाजावाजा करीत साजरा करण्यात आला. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा पार  फज्जा उडाला होता. वाढदिवस साजरा केल्यानंतर गवळी हे त्यांच्या घरी निघून  गेले. त्यानंतर, मारहाणीचा आणि गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या कार्यालयासमोर त्यांचे काही समर्थक उभे असताना त्याठिकाणी निलेश गवळी आणि  महेश भोईर हे दोघे जण आले. 

निलेश गवळीचे काही महिन्यांपूर्वी अन्य एका तरुणासोबत भांडण झाले होते. निलेशची त्याच्याबरोबर चर्चा सुरू असताना महेशने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पाहतापाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यादरम्यान, महेशने परवानाधारक रिव्हॉल्व्हर काढून  गोळीबार केला. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाFiringगोळीबार