शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेतील प्रभारी अधिक्षकाने केली वसई आय कार्यालयातच कागदपत्रांची चोरी? सीसीटीव्ही कॅमेरे बघून आयुक्तांनी केलं तात्काळ निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 21:57 IST

Crime News: आता तर चक्क वसई विरार महापालिकेतील कागदपत्रेच पालिकेच्या एका प्रभारी अधीक्षकाने पोत्यात भरून नेल्याचा धक्कादायक प्रकार  सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला आहे. 

वसई  - वसई-विरार शहर महापालिकेतील ठेका अभियंतांचे शहरातील अनधिकृत बांधकामां संबंधित वसुलीचे प्रताप समोर आल्यावर आयुक्तांनी तात्काळ  त्या सर्वावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना घरचा रस्ता दाखवला होता. मात्र आता तर चक्क वसई विरार महापालिकेतील कागदपत्रेच पालिकेच्या एका प्रभारी अधीक्षकाने पोत्यात भरून नेल्याचा धक्कादायक प्रकार  सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आला आहे.  या प्रकरणी महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी त्या अधिक्षकाला निलंबित करत  सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे.

थॉमस रॉड्रीग्ज असे या कथित आणि चोट्या प्रभारी अधिक्षकाचे नाव आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती आय, वसई गाव प्रभाग कार्यालयात थॉमस रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी विनापरवानगी गेला असता त्याठिकाणी त्याने घरपट्टी विभागातील काही कागदपत्रांची हाताळणी केली.  तदनंतर एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यात कागदपत्रे व व काही वस्तू सपशेल घेऊन गेला होता खरं तर ही घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. मात्र उशिरा का होईना या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच आयुक्त गंगाथरन डी.  यांनी पालिकेतील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी वसई कार्यालयात करीत असलेल्या संशयास्पद हालचाली व पोते भरून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  दरम्यान या प्रकरणी आयुक्तांनी रॉड्रीग्ज याला निलंबित केले असून  या प्रकरणाची सखोल  चौकशी सुरु करत सध्या रॉड्रीग्ज याला  सर्व चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात बजावण्यात आले आहेत. 

वसई विरार महापालिकेतील घरपट्टी विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.  तर बेकायदा बांधकामांना घरपट्टी लावण्यासाठी अक्षऱशः नागरिकांची लुबाडणूक केली जात असल्याचाही आरोप केला जातो. त्यामुळे अनधिकृत बांधकामे व त्यास घरपट्टी लावल्या आहेत त्या कशा व कधी व त्यासाठी किती पैसे आकारले एकूणच नेमकं या घरपट्टी लावण्यासाठी कितीचा भ्रष्टाचार झाला आहे हे कदाचित उघड होऊ नये यासाठीच ही कागदपत्रे लंपास केली असावी अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नेमक्या रॉड्रीग्जने घरपट्टी विभागातीलच कागदपत्रांची हाताळणी करून काही वस्तू व संचिका तर चोरून नेल्या नाहीत ना हे पाहणे गरजेचे आहे तसेच या सर्व प्रकारात त्याच्यासोबत अन्य कोणी कर्मचारी अधिकारी वर्ग किंवा दलाल तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील आहे का हे पाहणं आवश्यक आहे. गंभीर प्रकरणात विलंब का लागला, प्रकरण दाबायचे होते का ?ततत्कालीन नवघर मणिकपूर नगरपरिषद असताना कार्यरत असलेल्या थॉमस रोड्रिंक्स याने जास्तीत जास्त काळ नवघर माणिकपूर कार्यालयातच काढला त्यात आता रॉड्रीग्ज सुट्टीच्या दिवशी कुणाच्या परवानगीने कार्यालयात गेला व  त्यांनी कोणत्या वस्तू व कागदपत्रे चोरून नेली आणि रॉड्रीग्ज याच्या या चोरीची अनेक दिवस चर्चा रंगली असताना वसई प्रभाग समिती कार्यालयातील सहाय्यक आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची दखल का घेतली गेली नाही, असे नानाविध अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. 

नवघर माणिकपूर कार्यालयातुन होतंय लॉबिंग ?महत्वाचे म्हणजे रॉड्रीक्स तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेचा कर्मचारी असून सध्या महापालिकेच्या विविध विभागात नवघर-माणिकपूरमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या लॉबीचेच वर्चस्व असल्याचे बोलले जात आहे. तर काही नागरिकांनी आता घरपट्टी विभागात काम केलेले तसेच सहाय्य्क आयुक्त, उपायक्त यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केल्याने या प्रकरणी स्वतः आयुक्त काय ठोस भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे की प्रकरण दाबतात का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार