शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सनशाईन कंपनीने इतर जिल्ह्यातही घातला गंडा, कोट्यवधीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:41 IST

कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष देऊन अनेकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडणाºया सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम या कंपनीने गडचिरोलीसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे पसरविले आहे.

गडचिरोली  - कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष देऊन अनेकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडणाºया सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम या कंपनीने गडचिरोलीसोबत राज्यातील अनेक जिल्ह्यात आपले जाळे पसरविले आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात सदर कंपनीने २ कोटी २९ लाखांचा गंडा घालून पोबारा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत समोर आहे.गडचिरोली जिल्ह्यात २ हजार १३७ ठेवीदार या कंपनीच्या भुलथापांना बळी पडले. गुन्हा दाखल झाल्यानंतर या कंपनीच्या दोन संचालकांना गेल्या ३ जानेवारीला पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींच्या शोधात गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्यप्रदेशात ठाण मांडून बसले आहे. आरोपींना शोधण्यासोबतच सदर कंपनीच्या मालमत्तेचाही ठावठिकाणा पोलीस लावत आहेत. कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावातून पुढे गुंतवणूकदारांची रक्कम त्यांना परत मिळू शकेल का, याची चाचपणी पोलीस करत आहेत.दरम्यान सनशाईन कंपनीने गडचिरोलीप्रमाणेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नंदूरबार अशा अनेक जिल्ह्यात कार्यालय उघडून गुंतवणूकदारांना आमिष दिले. परंतू आता तेथील कार्यालयेही या कंपनीने गुंडाळली आहेत. असे असले तरी या कंपनीकडे पैसे गुंतवणारे अनेक जण अजूनही पुढे आलेले नाहीत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पुढे येऊन पोलीस तक्रार केल्यास त्यांच्या गुंतवणुकीचे पैसे कंपनीच्या मालमत्ता विक्रीतून त्यांना परत मिळू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी तक्रार करण्यास समोर यावे, असे आवाहन गडचिरोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली