शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

महाठग सुरेश चंद्रशेखर Netflix मधून शिकला Black & White चा खेळ; अमाप पैसा कसा लपवला? समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 14:00 IST

जून २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत क्राईम सिंडिकेटने तक्रारदाराची फसवणूक करून लीनाच्या पाच बँक खात्यांमध्ये २१ कोटी रुपये जमा केले होते.

नवी दिल्ली - सध्या गुन्ह्यांच्या अनेक घटनांमध्ये गुन्हेगार चित्रपट किंवा वेब सिरीजमधून शिकतात आणि गुन्हा करतात असं दिसून येत आहे. अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिससोबतच्या नात्यामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरबद्दलही अशी नवी माहिती समोर आली आहे. सुकेश आणि त्याची पत्नी लीना पॉल यांनी नेटफ्लिक्स सीरिज 'ओझार्क'(Ozark)मधून गुन्ह्याच्या युक्त्या शिकल्या होत्या. ते व्यवसायाच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होते अशीच मनी लॉन्ड्रिंगची कथा ओझार्कमध्ये दाखवली आहे हे आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रातून पुढे आले.  

या सीरिजमधून आयडिया घेऊन सुकेश चंद्रशेखर आणि पॉल यांनी अवैध मार्गाने जमा केलेला पैसा वैध करण्याचा मार्गही शोधला. त्यातील एक मार्ग म्हणजे पॉलचे सलून. त्यांनी Nail Artistry नावाचे सलून उघडले. 'ग्राहकांकडून' कमाई दाखवण्यासाठी वारंवार कार्ड स्वाइप केले जात होते. असाच 'गेम' सुपर कार आर्टिस्ट्री, एलएस फिशरीज, न्यूज एक्सप्रेस इत्यादी उद्योगातून खेळला गेला. सुकेश आणि लीना हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत.

LS म्हणजे काय?आरोपपत्रात म्हटले आहे की, 'तपासादरम्यान नेल आर्टिस्ट्री, सुपर कार आर्टिस्ट्री, एल.एस. मत्स्यव्यवसाय, एलएस एज्युकेशन आणि न्यूज एक्सप्रेस पोस्ट इत्यादींचे बँक स्टेटमेंट प्राप्त झाले. हे सर्व सुकेश आणि त्याच्या पत्नीशी संबंधित होते. येथे L म्हणजे लीना आणि S म्हणजे सुकेश. या कंपन्यांचा मनी लाँड्रिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. जून २०२० ते ऑगस्ट २०२१ दरम्यान, पॉलच्या बँक खात्यांमध्ये विविध कंपन्या आणि व्यक्तींकडून निधी जमा करण्यात आला. हे सर्व व्यवहार केवळ दाखविण्यासाठी अथवा फसवणुकीसाठी केल्याचं तपासात समोर आलं आहे.

MCOCA अंतर्गत दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, “फंडिगच्या जाळ्यात अरुण मुथू, बी मोहनराज आणि इतर अनेकांची नावे समोर आली आहेत. यासाठी लीना आणि सुकेश यांनी रोख रक्कमही दिली होती. जून २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत क्राईम सिंडिकेटने तक्रारदाराची फसवणूक करून लीनाच्या पाच बँक खात्यांमध्ये २१ कोटी रुपये जमा केले होते. ही खाती थेट लीनाशी जोडलेली आहेत किंवा तिच्या मालकीच्या कंपन्यांची आहेत.

अरुण मोहनराजसारखे सुकेश-लीनाच्या साथीदारांच्या मदतीने रोख ठेव, कार्ड स्वॅपिंगद्वारे ही कमाई दाखवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे. यातून सलूनमधून कमाई होत असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकीकडे गुन्हेगारी तर दुसरीकडे काळा पैसा पांढरा करण्याचा खेळ सुरू होता. लीना पॉल सध्या तुरुंगात आहे. जुलै २०१४ मध्ये तिने सुकेशसोबत लग्न केले. २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तिला पतीसह अटक करण्यात आली होती. अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलीनला सोडावे अशी इच्छा असल्याचे महाठगाने नुकतेच उघड केले होते. नकार दिल्यानंतरही नोराने त्याचा छळ सुरूच ठेवल्याचे त्याने सांगितले. 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसNora fatehiनोरा फतेही