गुंज येथील कृषी केंद्र मालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:10 PM2020-06-28T17:10:46+5:302020-06-28T17:10:54+5:30

कुमार टेमकर यांनी गुंज येथील कृषी केंद्र पंधरा दिवसापासून बंद ठेवले होते.

Suicide of the owner of an agricultural center at Gunj | गुंज येथील कृषी केंद्र मालकाची आत्महत्या

गुंज येथील कृषी केंद्र मालकाची आत्महत्या

Next

यवतमाळ:   तालुक्यातील गुंज येथील प्रगतिशील शेतकरी तसेच  शिवकृपा कृषी केंद्राचे मालक कुमार टेमकर (वय 42) यांनी शनिवारी कान्हेश्वर देवस्थानाच्या परिसरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, आई-वडील,  भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.

कुमार टेमकर यांनी गुंज येथील कृषी केंद्र पंधरा दिवसापासून बंद ठेवले होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण करू शकले नाही. हे घटनास्थळ पुसद ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहे.  कृषी केंद्र संचालकाची तालुक्यात ही पहिली आत्महत्या आहे.

Web Title: Suicide of the owner of an agricultural center at Gunj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.