शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेने संपविले आयुष्य; पतीला सापडू नये म्हणून चिठ्ठी गुप्तांगामध्ये लपविलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 19:43 IST

दोघांवर गुन्हा दाखल : लग्नानंतर एक महिन्यातच संपवले जीवन 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती व सासू विरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाच्या एकच महिन्यात या विवाहितेची जीवनयात्रा संपली आहे. 

नेरुळ सेक्टर २७ येथील साईकृपा सोसायटीत हा प्रकार घडला आहे. तिथे राहणाऱ्या साक्षी (नाव बदललेले) या नवविवाहितेने रविवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचे पती व सासू विरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे तिचे मामांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी हीच विवाह नेरूळच्या शशी बामणे याच्यासोबत ३ जूनला झाला आहे. लग्नानंतर काही दिवसातच पती शशी व सासू शकुन यांच्याकडून तिचा कारसाठी छळ सुरु झाला होता. कार खरेदीसाठी माहेरून पैसे घेऊन ये यासाठी तिच्यावर दबाव टाकत तिचा छळ देखील केला जात होता. याबाबत तिने कुटुंबियांना कल्पना देखील दिली होती.

अशातच काही दिवसांपासून तिला माहेरच्या व्यक्तींपासून बोलण्यास अडवले जात होते. त्यासाठी पतीने तिचा मोबाईल देखील ताब्यात घेतला होता. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी नेरुळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देत पती व सासू विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. 

गुप्तांगात आढळली चिट्टी

कारसाठी साक्षीचा होणारा अमानुष छळ तिला सहन होत नव्हता. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र आपला छळ करणाऱ्या पती व सासूवर कठोर कारवाईची इच्छा तिने चिट्ठीमध्ये लिहून ठेवली होती. आत्महत्येनंतर ही चिठ्ठी पतीच्या हाती लागल्यास नष्ट केली जाऊ शकते. यामुळे तिने ती चिठ्ठी गुप्तांगात लपवून ठेवली होती. आत्महत्येनंतर पंचनाम्यांदरम्यान हि चिठ्ठी तिच्या गुप्तांगात आढळून आली.

टॅग्स :dowryहुंडा