शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

पुस्तकाच्या ५० पानांवर 'I hate my life' लिहून केली आत्महत्या, ९ व्या वर्गात शिकत होती विद्यार्थिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 11:56 IST

पहिल्या आत्महत्येची घटना भिलाईच्या खुर्सीपार पोलीस स्टेशन अतंर्गत १६ वर्षीय अल्पवयीन एम चांदनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

छत्तीसगढच्या दुर्ग आणि भिलाईमध्ये दोन आत्महत्येच्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही तरूणी मागे अनेक रहस्य सोडून गेल्या आहेत. एकीने स्वत:चं जीवन संपण्याआधी आपला स्मार्टफोन फॉर्मॅट केला तर दुसऱ्या विद्यार्थीनीने आपल्या पुस्तकाच्या ५० पानावर 'I Hate My Life' असं लिहिलं आहे. दोन विद्यार्थीनीच्या या कृत्यामुळे सगळे हैराण झाले आहेत.

पहिल्या आत्महत्येची घटना भिलाईच्या खुर्सीपार पोलीस स्टेशन अतंर्गत १६ वर्षीय अल्पवयीन एम चांदनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या या पावलामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना काहीच कळत नाहीये की, मुलीने असं का केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेवेळी मुलीचे आई-वडील ओळखीच्या कुणालातरी भेटण्यासाठी गेले होते. ते घरी आले तेव्हा त्यांना मुलीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी येऊ मृतदेह खाली काढला. पोलिसांना घटनास्थळी एक पुस्तक मिळालं असून त्याच्या ५० पानांवर मुलीने इंग्रजीत 'आय हेट माय लाइफ' लिहिलं आहे.

काही पानांवर तिने तरूण-तरूणीसोबत बसल्याचे चित्रही काढले आहे.  तर एका पानावर एकट्या बसलेल्या तरूणीचं चित्र आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, चांदनीची एका तरूणासोबत मैत्री होती. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. 

फॅशन डिझायनर तरूणीची आत्महत्या

दुर्गच्या मोहन नगर पोलीस स्टेशन भागातील शंकर नगरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय सुष्मिता डोंगरे हिने रात्री २ ते सकाळी ६ वाजता दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीय तिला उठवण्यासाठी गेले तेव्हा तिचा मृतदेह आढळून आला. 

पोलिसांना प्राथमिक पाहणीत आढळून आलं की, सुष्मिता फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत होती लॉकडाऊनमुळे गेल्या एक वर्षापासून ती घरीच आहे. पोलिसांनी तपासात आढळून आलं की, मोबाइल फॉर्मॅट केल्यावर विद्यार्थीनीने आत्महत्या केली. अजून तरूणीच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश