शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

तोतया एनसीबी अधिकाऱ्याच्या दबावाचा बळी, जोगेश्वरीत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या; दोघांना अटक, मित्रानेच रचला कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 06:05 IST

Crime News : सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी हा बांधकाम कंत्राटदार आहे तर, वळिंबे हा खासगी नोकरी करत असून आसनगाव येथील रहिवासी आहे.

मुंबई : हुक्का पार्लरमध्ये पार्टी सुरू असताना अचानक एनसीबीचा छापा मारल्याचे सांगत एका भोजपुरी अभिनेत्रीला ताब्यात घेतले. पुढे, कारवाईच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी २०  लाखांच्या खंडणीसाठी तोतया एनसीबीच्या अधिकाऱ्याने दबाव टाकला. याच दबावात अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना जोगेश्वरीत घडली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी एनसीबी अधिकारी  असल्याचा बनाव करणाऱ्या दुकलीला अटक करण्यात आली आहे. मित्रानेच हा कट रचल्याची माहिती समोर येत असून त्याचा शोध सुरू आहे.

सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. परदेशी हा बांधकाम कंत्राटदार आहे तर, वळिंबे हा खासगी नोकरी करत असून आसनगाव येथील रहिवासी आहे. अभिनेत्री जोगेश्वरी येथील हिल पार्कमध्ये  भाड्याने राहत होती. पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० डिसेंबर रोजी अभिनेत्री आपल्या मित्र मैत्रिणीसह एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होती. त्यादरम्यान या दुकलीने एनसीबीचा छापा पडल्याचा बनाव करत, अभिनेत्रीला ताब्यात घेतले.

कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली. पुढे संबंधित रक्कम लवकर मिळण्यासाठी दबाव वाढवला. याच दबावाला कंटाळून अभिनेत्रीने २३ तारखेला जोगेश्वरी येथील हिल पार्क परिसरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच, अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अभिनेत्रीला जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वी तिला मृत घोषित केले.मैत्रिणीच्या चौकशीत एनसीबी अधिकाऱ्याची माहिती समोर येताच अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.

मित्राचा शोध सुरूअभिनेत्रीचा मित्र अझीम काझी आरोपींच्या संपर्कात होता. त्यानेच अभिनेत्रीकडून पैसे उकळण्यासाठी कट रचल्याचे समोर येत आहे. काझी पसार झाला असून त्याच्यासह त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

एनसीबी अधिकाऱ्यांची खासगी सेना - मलिकभोजपुरी अभिनेत्रीच्या आत्महत्येने एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा मुंबईतील खासगी सेनेचा अँगल तपासण्याची मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.मुंबईत २३ डिसेंबरला एका भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. काही लोक एनसीबीचे अधिकारी असल्याची बतावणी करून या अभिनेत्रीकडून पैसे उकळत होते, असे उघड झाले आहे. यात अधिकाऱ्यांनी खासगी सेना उभारली होती आणि त्यातून वसुली सुरू होती, असे ते म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी