शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न, भेंडी बाजार येथील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 07:10 IST

३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पटेल यांच्या कार्यालयात एक व्यक्ती स्वतःवर चाकूने वार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी  त्याला तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल केले. 

मुंबई : आमदार भेटले नाहीत म्हणून ४० वर्षीय व्यक्तीने नशेमध्ये आमदार अमीन पटेल यांच्या कार्यालयातच स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भेंडी बाजार येथे समोर आली आहे. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जे. जे. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले मंगेश ब्राह्मणे (३८) यांच्या फिर्यादीवरून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. ३० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पटेल यांच्या कार्यालयात एक व्यक्ती स्वतःवर चाकूने वार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी  त्याला तत्काळ जे. जे. रुग्णालयात दाखल केले. 

पोलिसांच्या चौकशीत, त्याचे नाव मोहमद हुसेन इनायतअली खान (४०) असल्याचे समजले. १२:५०च्या सुमारास  नारळ तोडण्याचा चाकू हातात घेत तो कार्यालयात आला. आमदारांना भेटायचे आहे सांगताच, तेथील कर्मचाऱ्यांनी आमदार अधिवेशनासाठी नागपूरला असल्याचे सांगितले. तसेच त्याला चाकू खाली ठेवण्यास सांगितले. मात्र, आमदारांना भेटू दिले नाही तर आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. काही समजण्याच्या आतच त्याने हातातील चाकूने डोक्यावर वार केले. खान हा पूर्वी भेंडीबाजार परिसरात अंगठी विकण्याचा व्यवसाय करायचा.  ३० तारखेला भेंडीबाजार परिसरात पाण्याची पाइपलाइन देण्यासाठी नशेमध्ये खानने सुरक्षा रक्षकांशी वाद घातला. तेथून तो आमदारांच्या कार्यालयात गेला व त्याने स्वतःवर चाकूने वार करून घेतले. 

नशेमध्ये कृत्य ... खान हा नशेमध्ये हातात चाकू घेऊन कार्यालयात आला. मी अधिवेशनासाठी नागपूरला असल्याचे त्याला सांगून, चाकू खाली ठेवण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी केली. मात्र, त्याने नशेमध्ये स्वतःच्या डोक्यावर मारून घेतले. याबाबत समजताच जे. जे.तील डॉक्टरांशी संपर्क करून त्याला तत्काळ उपचार उपलब्ध करून दिले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी पोलिस अधिक  तपास करत आहेत. - अमीन पटेल, आमदार

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी