शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बँक फ्रॉड प्रकरणी सुधीर भटेवराला अटक; १३ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:56 IST

न्यायालयाने भटेवरा याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचबरोबर अन्य १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

पुणे : नामांकित बँकेमधील डारमेंट खात्याचा डेटा प्रकरणात सायबर पोलिसांनी पळून गेलेल्या सुधीर भटेवरा याला अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. सुधीर शांतीलाल भटेवरा (वय ५४, रा. एम्पायर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनघा मोडक तसेच औरंगाबाद येथील राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे सुधीर भटेवरा याच्या घरी १५ मार्च रोजी रात्री आले होते. शर्मा आणि संधू यांच्यासाठी भटेवरा याने २५ लाख रुपयांची सोय केली होती. 

पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन २५ लाख रुपये जप्त केले होते. या वेळी भटेवरा याला चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याची ४१ नुसार नोटीस दिली होती. मात्र, तो पळून गेला होता. त्यामुळे सायबर पोलिसांनी रविवारी रात्री त्याला अटक केली.पोलिसांनी भटेवरा याच्याबरोबर इतर १३ आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले, भटेवरा याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. ते त्याने कोणाकडून आणले. त्याच्या मोबदल्यात त्याला इतर आरोपींकडून कोणता डेटा मिळणार होता.

राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्याशी त्याचा संपर्क कसा झाला, त्यांना मिळालेल्या बँक खात्यांचा डेटाचा ते पैसे काढण्यासाठी कसा उपयोग करणार होते, याचा तपास करायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने भटेवरा याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचबरोबर अन्य १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

'हा सर्व क्लिष्ट तपास आहे'  नामांकित बँकेतील डॉरमेट खात्यातील २१६ कोटी रुपयांचा डेटा मिळविणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबाद येथून अटक केलेले लक्ष्मीनारायण गुट्टू आणि व्यंकटेश उपाला यांना बँक खात्याचा डेटा कसा मिळाला. त्यांनी तो अनघा मोडक हिला कसा पाठविला. त्यांच्यात नेमका काय व्यवहार झाला. तसेच या डेटाचा वापर करून ते नेमके खात्यातील पैसे कसे काढून घेणार होते. हा सर्व क्लिष्ट तपास आहे. या खात्यांबाबत बँकांकडून माहिती आली आहे. ती पडताळून पाहून त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी सांगितले. 

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँक