शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठांविरोधात लेटरबॉम्ब टाकून उपनिरीक्षक बेपत्ता; कळंबोली पोलीस ठाण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:42 IST

कळंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक मनेष बच्छाव शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक यांना पाठवलेले पत्र व्हायरल झाले आहे.

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वरिष्ठांकडून गैरउद्देशाने छळ होत असल्याचा आरोप करत पोलीस उपनिरीक्षक बेपत्ता झाल्याची घटना कळंबोली पोलीस ठाण्यात घडली आहे. दरम्यान, वर्षभरापूर्वी एक हवालदारदेखील अशाच प्रकारे बेपत्ता झाल्याची घटना याच ठिकाणी घडली होती. उपनिरीक्षकाने मुख्यमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांच्याकडे टाकलेल्या लेटरबॉम्बमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे नवी मुंबईत बदल्यांमागे अर्थकारण होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

कळंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक मनेष बच्छाव शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पोलीस महासंचालक यांना पाठवलेले पत्र व्हायरल झाले आहे. या लेटरबॉम्बमध्ये त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हा छळ टार्गेटपूर्तीच्या उद्देशाने होत असल्याचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी याच पोलीस ठाण्यातील एका हवालदारानेदेखील अशाच प्रकारे वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अज्ञातवास गाठला होता.

बदल्यांमागे अर्थकारणनवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बदल्यांमागे मोठे अर्थकारण होत असल्याच्या चर्चा यापूर्वीही रंगल्या होत्या. त्यातूनच अवैध धंद्यांना थारा मिळत असल्याचेही बोलले जात होते. अशातच उपनिरीक्षकानेच वरिष्ठांवर भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, लेटरबॉम्ब टाकून बेपत्ता झालेल्या उपनिरीक्षक मनेष बच्छाव यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व उपायुक्त शिवराज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Policeपोलिस