शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! पोलिसांपुढे आव्हान :तालुक्यात डझनभर घरे फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 01:31 IST

वाडा : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोनाळे परिसरात शनिवारी रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडली.

वाडा : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सोनाळे परिसरात शनिवारी रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडून ६१ हजार रु पये किंमतीचा रोख रकमेसहित ऐवज लंपास केल्याच्या घटनेनंतर काल रात्री वाडा शहरातील शिवाजी नगर परिसरात दोन घरफोड्या करून हिरे व सोन्याचे दागिने असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या नित्याच्याच चोऱ्यांमुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.वाडा तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चोरट्यांनी अक्षरश: धूमाकूळ घातला असून वाडा शहर, गोºहे, नाणे, कुडूस, मेट, शिरीषपाडा, वावेघर, नेहरोली आदी ठिकाणी घरे दुकाने फोडून व दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे खुपरी येथील घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. विशेषत: गोºहे येथील दुकानदार प्रकाश खिलारे यांचे दुकान फोडल्याने खिलारे यांना हृदयविकाराचा झटका येऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनांनी तालुक्यातील नागरिक धास्तावले असून गुन्हेगारांना कधी चाप बसेल याच्या प्रतिक्षेत आहेत.शनिवारी (दि. ४)रात्रीच्या सुमारास सोनाळे परिसरातील मोजमध्ये तीन घरे, बिलघर मध्ये आठ घरे व सोनाळे मध्ये एक घर अशी एकूण बारा घरे फोडून चांदी व सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या बारा घरफोड्यांमध्ये नामदेव पठारे, बाळकृष्ण पठारे, एकनाथ गव्हाळे, भास्कर गव्हाळे, सुभाष गव्हाळे, बबन जोगमार्गे, शांता शांताराम पठारे, काशिनाथ गव्हाळे, किसन दळवी, वैभव पठारे मनोहर घागस यांच्या घरांचा समावेश असून हे सर्व नोकरी धंदानिमित्त विविध शहरात राहत असल्याने व गावाकडील घरे बंद असल्याने चोरट्यांनी येथे डल्ला मारला आहे.तसेच रविवारी (दि. ५) वाडा शहरातील शिवाजी नगर येथे राहणा-या उदय नाईक व कल्पना ठाकरे यांची घरे फोडून नाईक यांच्या घरातील एक हि-याचा पावणेतीन लाख रु पये किंमतीचा हार, दोन अंगठ्या, कर्णफुले व ४० हजार रु पये रोख रक्कम तर ठाकरे यांच्या घरातील एलसीडी टीव्ही व किरकोळ सामान असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अलका करडे करीत आहेत.दरम्यान, तालुक्यात लग्न सराई जोरदार सुरू आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत नागरिकांचे जाणे येणे सुरू असते. पंरतु पोलिसांच्या नाका बंदी व गस्तीमुळे सामान्य नागरिकालाही पोलिसांच्या चौकशीला व कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून लवकरात लवकर या चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत. तर पोलीस ही कामगिरी लवकरच पार पाडू असा निर्वाळा देत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार