शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! सावत्र आई असलेल्या मावशीचे लहानग्यावर अमानुष अत्याचार; चटके दिल्यानं चिमुरडा भाजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 14:42 IST

नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू; दिंडोरी पोलिसांकडून कारवाई सुरू

दिंडोरी (नाशिक) : माय मेली तरी मावशी जगावी अशी म्हण आहे  पण आई व मावशी या दोन्ही नात्यांना काळिमा फासणारी घटना दिंडोरी तालुक्यातील पाडे येथे घडली असून मूकबधिर मुलाला सावत्र आई असलेल्या मावशीने अंगावर चटके देत अमानुष अत्याचार केल्याची घटना व्हिडीओ व्हायरल झाल्याने उघडकीस आला आहे. सदर बालकावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की पाडे येथील तीन वर्षीय मतिमंद बालकास त्याची सावत्र आईने अमानुषपणे मारहाण केली.  अनेक ठिकाणी चटके देत अत्याचार केले.ही घटना काही नागरिकांना समजताच त्यांनी त्यास दिंडोरी येथे उपचारासाठी नेले तेथे उपचार करून पुढे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले .सदर सावत्र आई ही त्या बाळाची मावशी आहे.कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर सावत्र आई ही मावशी असल्याने तिची माया मिळेल ही आशा फोल ठरत नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने संताप व्यक्त होत आहे दिंडोरी पोलिसांनी घटनेची दखल घेत कारवाई सुरू केली असून पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कलपेशकुमार चव्हाण करत आहे.सावत्र आईने आरोप फेटाळलाया घटनेनंतर सावत्र आईच मुलाला घेऊन रुग्णालयात आली. मुलाला चटके दिल्याचा आरोप तिने फेटाळला आहे. हा लहानगा आणि त्याच्या मोठ्या भावामध्ये भांडण झालं. त्यातून ही घटना घडली आहे, असं दावा तिने एबीपी माझाशी बोलताना केला आहे.