शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला संदेश पाठविल्याने चाकूचा धाक दाखवत मोबाइलची केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 07:02 IST

चाकूच्या धाकात मोबाइल घेऊन चोरटे पसार.

त्रिकुटाला अटक

मुंबई : रस्त्यावरून जाताना त्रिकुटाने हटकत बहिणीला संदेश का पाठवतो म्हणत धक्काबुकी केली. काही समजण्याच्या आतच चाकूच्या धाकात त्यांच्यासह मित्रांचे मोबाइल चोरल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला. या प्रकरणी गुन्हे शाखेने तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

मालाड परिसरातून तक्रारदार १८ फेब्रुवारी रोजी दोन मित्रांसोबत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी त्याला अडविले.  बहिणीला फोनवरून मेसेज का करतो? असे म्हणत दमदाटी सुरू केली. चाकूच्या धाकात मोबाइल घेऊन ते पसार झाले. मात्र तक्रारदार तसेच त्यांच्या मित्रांपैकी कुणालाही संदेश केला नसल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेचे  गांभीर्य लक्षात घेत, गुन्हे शाखेने याचा समांतर तपास सुरू केला.                   

घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, आरोपी हे थोड्या अंतरावर पळत जाऊन ऑटोरिक्षाने निघून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर तांत्रिक तपास हे मालवणी, मालाड येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कक्ष ११ चे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गवस, मानसिंग पाटील,  अभिजित जाधव, विशाल पाटील, अजित कानगुडे यांनी विविध पथके स्थापन करीत आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.  

अटक आरोपी सराईत गुन्हेगार अटक करण्यात आलेले त्रिकूट सराईत गुन्हेगार असून एका आरोपीविरोधात १५  गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई