शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

कोरोना काळात पैशांसाठी चोरीचा मार्ग; सहा दुचाकी केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 07:02 IST

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतील स्थानिक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने दुचाकी चोरणाऱ्या सराईत तीन आरोपींना पकडले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या काळात पैसे कमविण्याचा मार्ग नसल्याने आपण दुचाकी चोरी केल्याचे या आरोपींनी कबूल केले. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघड करून सहा चोरीच्या दुचाकीही जप्त केल्या आहेत.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतील स्थानिक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश दिलेले आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना आरोपींची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांनी व पथकाने तपास करून तीन आरोपींना अटक केली. इरफान शेख (२१), रफिक शेख (२५) आणि विकास गुंजाळ (२२) अशी नावे आहेत. 

दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडीकोरोना काळात कुठूनही हातात पैसे येत नसल्यामुळे या चोऱ्या केल्याचे आरोपींनी पोलीस चौकशीमध्ये कबूल केले आहे. तिन्ही आरोपींकडून २ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. वालीव येथील एक, नयानगर येथील एक आणि नारपोली येथील तीन असे पाच गुन्हे पोलिसांनी उघड केले आहे. आरोपींना २ दिवसांची कोठडी वसई न्यायालयाने सुनावली.