शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘The Fast & Furious’ स्टाइलमध्ये करत होते चोरी, एका महिन्यात लंपास केल्या ४० लक्झरी कार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 13:51 IST

Delhi Crime: पोलीस उपायुक्त मनोज सी म्हणाले की, आरोपी हॉलिवूड सिनेमा 'द फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस' ने प्रेरित होते आणि त्यांनी काही मिनिटांमध्ये कार अनलॉक करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला.

Delhi Crime: हॉलिवूड सिनेमाची सीरीज 'द फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस' ने प्रेरित होऊन तीन लोकांनी दिल्ली-एनसीआरमधून ४० लक्झरी कारची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ४० लक्झरी कार्स गेल्या महिन्यात चोरी झाल्या. या गाड्या चोरी करण्यासाठी त्यांनी जीपीएस जॅमर, स्कॅनर आणि रिमोट कंट्रोल कार्ससहीत अनेक गॅजेट्सचा वापर केला. चोरी केल्यानंतर गाड्या जास्त किंमतीत विकल्या जात होत्या. पोलिसांनी सांगितलं की, टोळीतील एक उत्तर प्रदेशच्या मेरठचा राहणारा आहे. जो रवि उत्तम नगर गॅंगचा सदस्य आहे.

पोलीस उपायुक्त मनोज सी म्हणाले की, आरोपी हॉलिवूड सिनेमा 'द फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस' ने प्रेरित होते आणि त्यांनी काही मिनिटांमध्ये कार अनलॉक करण्यासाठी स्कॅनरचा वापर केला आणि नंतर कारमधील जीपीएस निष्क्रिय करण्यासाठी जॅमरचा वापर केला. पोलिसांना आरोपींकडे दोन पिस्तुलसोबतच सेंसर किट, चुंबक, एलएनटी चाव्या आणि आठ रिमोट कारच्या चाव्या सापडल्या.

डीसीपी म्हणाले की, आरोपींनी खुलासा केला की, एक सॉफ्टवेअर हॅकिंग डिवाइसचा वापर करून त्यांनी आधी कार अनलॉक केल्या. त्यानंतर कारचं सॉफ्टवेअ फॉर्मॅट करून डिवाइसच्या मदतीने नवीन सॉफ्टवेअर टाकलं. 

नवीन चाव्या तयार केल्या आणि त्यांनी दोन ते तीन मिनिटांमध्ये कार चोरी केली. डीसीपी पुढे म्हणाले की, कार चोरी केल्यावर चोर त्या सोसायटी, हॉस्पिटल आणि अशा ठिकाणी पार्क करत होते जिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाहीत. मग चोरी केलेल्या या कार आरोपी राजस्थान आणि मेरठला जास्त किंमतीत विकत होते.

आरोपींमध्ये ४२ वर्षीय मनीष राव, ४३ वर्षीय जगदीप शर्मा आणि ४० वर्षीय आस मोहम्मद यांचा समावेश आहे. राव आणि शर्मा दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये राहणारे आहेत. तेच मोहम्मद मेरठचा आहे. पोलिसांनी राव आणि शर्माला तेव्हा पकडलं जेव्हा ते एका भागात चोरी केलेल्या कारचं डील करत होते. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी एप्रिलपासून उत्तम नगर, तिलक नगर, सुभाष नगर, पश्चिम विहार,मुनिरका आणि द्वारका येथून ४० कार्सची चोरी केली. 

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी