शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

येऊर, घोडबंदर रोडवरील डझनभर अवैध धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; बारा जणांना अटक 

By अजित मांडके | Updated: December 19, 2022 17:15 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी नाताळ व नवर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील निर्सग रम्य असलेल्या येऊर व घोडबंदर येथे शनिवार - रविवारी अशा सलग दोन दिवस अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या १२ धाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने धडक कारवाई केली. या कारवाई त्या धाब्यांवरील १२ (मॅनेजर) जणांना अटक करत, अंदाजे २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आगामी नाताळ व नवर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर विशेष भरारी पथकाच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. नागरीकांनी कुठल्याही प्रकारच्या कमी किंमतीच्या व बनावट मद्याच्या आहारी जावू नये, असे मद्य आपल्या शरीरास अपायकारक ठरु शकते. त्यामुळे शासनमान्य दुकानातून मद्य खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी अनधिकृत धाब्याचे समुळ उच्चाटन करण्याकामी इतर विभागाशी संपर्क साधून धाबे व अवैध मद्य विक्रीवर संयुक्तरित्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे अधीक्षक निलेश सांगड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील येऊर आणि घोडबंदर रोडवर अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या धाब्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार  १२ धब्यांच्या अटक करत २१ हजार ९३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क बी विभागाचे निरीक्षक शिवशंकर पाटील व दुय्यम निरीक्षक सलीम शेख, मनोज संबोधी व जवान संदिप पाटील, राजेशकुमार तारु व इतर कर्मचाऱ्यांनी केली. 

गतवर्षाच्या तुलनेत २५.३८ कोटींचा जास्त महसूल जमा - ठाणे जिल्हयामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एकूण १ हजार ९७६ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये १ हजार २४८ वारस व ७२५ बेवारस गुन्हयांचा समावेश आहे. तर या कारवाईमध्ये १ हजार ३२७ जणांना अटक केली. याशिवाय ८८ वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच एकूण ७.५० कोटी रुपयांचा मुद्देमाल केला आहे. याच कालावधीत एकूण १३१.०८ कोटी रुपयांचा महसूल शासनास प्राप्त करुन दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २५.३८ कोटी रुपये जास्त महसूल जमा करुन देण्यात विभागाला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

"येऊर आणि घोडबंदर रोडवरील १२ धाब्यांवर शनिवार- रविवारी कारवाई करण्यात आली. यामध्ये १२ जणांना अटक केली. ते त्या धाब्यांवरील मॅनेजर असून ही कारवाई यापुढे अशी सुरू राहणार आहे. "- नीलेश सांगड, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ,ठाणे विभाग. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस