शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसआरपीएफ जवानाची प्रकृती चिंताजनक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 22:17 IST

या जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देया जवानाचं नाव दत्तात्रय चव्हाण (२८) असं आहे. घरातील वादाला कंटाळून असं कृत्य केल्याचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. दत्तात्रय यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबई - मलाबार हिल येथील राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनात तैनात एसआरपीएफ जवानाने स्वत:वर  गोळी झाडून काल आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. या जवानाचं नाव दत्तात्रय चव्हाण (२८) असं आहे. या जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.   सीआरपीएफ स्टाफ क्वार्टर्समध्ये दत्तात्रय चव्हाण यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिवॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न काल केला. गोळीचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी चव्हाण त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर चव्हाण यांना त्वरीत जखमी अवस्थेत एलिझाबेथ रूग्णालयात केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी बॉम्बे रूग्णालयात हलविण्यात आले. दत्तात्रय यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दत्तात्रय हे मूळचे औरंगाबाद इथं राहणारे आहेत. दत्तात्रय चव्हाण यांच्याजवळ एक सुसाईड नोट देखील मिळाली आहे. घरातील वादाला कंटाळून असं कृत्य केल्याचे निर्णय घेतल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यावेळी चव्हाण सुट्टीवर होते. याप्रकरणी मलबार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याMumbaiमुंबईSoldierसैनिकhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस