शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खंडणीसाठी किडनॅपर्सनी चोरलं पाणीपुरीवाल्याचं सिम; शक्कल लढवली पण झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:06 IST

रुद्रचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी कोणालाही संशय येऊ नये म्हणून १० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी पाणीपुरीवाल्याचं सिम कार्ड चोरलं होतं.

श्रीगंगानगरमधील चिमुकला रुद्र शर्माच्या अपहरण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रुद्रचं अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी कोणालाही संशय येऊ नये म्हणून १० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी पाणीपुरीवाल्याचं सिम कार्ड चोरलं होतं. आरोपीने त्या सिमचा वापर करून WhatsApp एक्टिव्ह केलं आणि रुद्रला सोडण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपींच्या चौकशीदरम्यान ही बाब उघड झाली. आरोपीच्या या कल्पनेने पोलीसही हैराण झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी दीपक कुमार उर्फ ​​दीपू (२०) आणि निखित उर्फ ​​लकी (२०) हे हिंदूमलकोट पोलीस स्टेशन परिसरातील खाटवलना गावातील रहिवासी आहेत. दोघेही जवळचे मित्र आहेत. दीपूचे वडील श्री गंगानगरमध्ये स्टील वेल्डर म्हणून काम करतात तर लकीचे वडील टेम्पो चालवतात. दीपू रील्स बनवत राहतो आणि त्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राहतो. दोघेही नुकतेच चंदीगडहून परतले होते. दोघांनाही आरामदायी जीवन जगण्याची इच्छा होऊ लागली.

ती इच्छा पूर्ण करण्यासाठी दोघांनीही पैशाची व्यवस्था करण्यासाठी एका मुलाचं अपहरण करण्याचा प्लॅन केला. यासाठी दोघेही श्रीमंत कुटुंबातील मुलाच्या शोधात होते. ७ जानेवारी रोजी, जेव्हा ते मुलाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता, तेव्हा त्यांना रामदेव कॉलनीतील घरासमोर रुद्र खेळताना दिसला. रुद्रशी बोलून ओळख वाढवली. त्यादिवशीच ते रुद्रचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिथे गर्दी असल्याने ते तसं करू शकले नाहीत. ८ जानेवारी रोजी पुन्हा तिथे गेले आणि रुद्रशी बोलले.

रुद्रला मोठी पतंग हवी होती. त्याने तशी इच्छा व्यक्त केली तेव्हा ते रुद्रला घेऊन बाईकवरून पळून गेले. नंतर पाणीपुरीवाल्याचं सिमकार्ड चोरून WhatsApp एक्टिव्ह केलं. मग त्यांनी रुद्रच्या परिसरातील जिम मालकाला फोन करून त्याच्या अपहरणाची माहिती दिली. आरोपी म्हणाले की, मुलगा आमच्या ताब्यात आहे, त्याच्या कुटुंबियांना कळवा. जर तुम्हाला मुलगा हवा असेल तर दहा लाख रुपयांची व्यवस्था करा.

रुद्रच्या आजोबांना याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना सांगितलं. नंतर श्रीगंगानगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रघुवीर प्रसाद शर्मा हे रुद्रचे काका असल्याचं भासवून आरोपीशी सुमारे ५० वेळा बोलले. पोलिसांनी आरोपीला फोनवर व्यस्त ठेवले. याच दरम्यान, पोलिसांनी मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रेस केलं. नंतर, अपहरणकर्त्यांना पकडण्यात आलं आणि रुद्रची सुखरूप सुटका करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण