शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थुंकी अंगावर उडाली; डाेंबिवलीत जाब विचारल्याने हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:19 IST

मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली :  अंगावर थुंकी उडाल्याचा जाब विचारला म्हणून केलेल्या मारहाणीत विजय पटवा या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी कैफ खान (वय १९) तरुणाला अटक केली आहे. त्याला रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात राहणारे पटवा हे दुपारी दुचाकीवरून चिंचोड्याचा पाडा परिसरातून जात होते. त्याच वेळेस रस्त्यावरून पायी चालत जात असलेला कैफ हा रस्त्यावर थुंकला. या दरम्यान मागून दुचाकीने येणाऱ्या पटवा यांच्या अंगावर थुंकी उडाली. त्याचा जाब पटवा यांनी कैफला विचारला. याचा कैफला राग आला आणि त्याने पटवा यांना शिवीगाळ करून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे पटवाही संतापले. दोघांत सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. कैफने विजय पटवा यांना लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पटवा हे रस्त्यावर खाली कोसळले. त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण n कैफने विजय पटवा यांना लाथा, बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पटवा हे रस्त्यावर खाली कोसळले.n विजय पटवा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागेवरच बेशुद्ध पडले. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. n मात्र, तत्पूर्वीच विजय पटवा यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी