शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

नागपुरात भरधाव ट्रकने आजोबा-नातवाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:13 IST

कामठी-भंडारा मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीवर स्वार आजोबा आणि नातवाला चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देमुलगी-नातही जखमी : यशोधरानगरात भीषण अपघात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कामठी-भंडारा मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीवर स्वार आजोबा आणि नातवाला चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकीवर स्वाराची मुलगी आणि नातही जखमी झाल्या. यामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.जीवनलाल मोतीलाल साहू (५०) आणि श्रेष्ठ पन्ना प्रजापती (६) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमीत लीला पुन्नीलाल प्रजापती (२६) आणि त्यांची दोन वर्षाची मुलगी रिद्धीचा समावेश आहे. गुलशननगर येथील रहिवासी जीवनलाल साहू बांधकाम ठेकेदार होते. त्यांच्या परिवारात भरत आणि संजय ही दोन मुले आणि मुलगी लीला आहे. लीला उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरमध्ये राहते. ती आईवडिलांना भेटण्यासाठी सकाळी ७ वाजता मुलगा आणि मुलीसह नागपुरात आली. लीलाने शारदा चौकात बसमधून उतरल्यानंतर वडिलांना फोन करून घेण्यासाठी बोलावले. साहू मुलीला आणण्यासाठी बाईकने तेथे पोहोचले. लीलाजवळ सामान असल्यामुळे साहू यांनी मुलगा भरत आणि संजयला बाईक घेऊन येण्यास सांगितले. वडिलांच्या बाईकवर लीला, तिचा मुलगा आणि मुलगी घराकडे जात होते. तर भरत आणि संजय सामान घेऊन जात होते. यशोधरानगर ठाण्याच्या कामठी मार्गावरील शारदा कंपनीजवळ भरधाव ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली. ट्रकच्या चाकात आल्यामुळे साहू आणि त्यांचा नातू गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. नेहमीच अपघात घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला. घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांनी नागरिकांना शांत करून वाहतूक सुरळीत केली. महिनाभरात कळमना ठाण्याच्या परिसरातील ही दुसरी मोठी घटना आहे. यापुर्वी बाजारातून परत येणाऱ्या दोन युवकांना चिखली उड्डाणपुलाजवळ ट्रकने चिरडले होते. परिसरात अवजड वाहनांची मोठी गर्दी राहते. वाहनचालक निष्काळजीपणे वाहने चालवितात. अपघात घडल्यावर पोलीस सक्रीय होतात आणि पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते. पोलीस दुचाकी, लहान वाहनचालकांना त्रास देतात. परंतु अवजड वाहनांवर कारवाई होत नाही. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.चिमुकली बचावलीअपघाताच्या वेळी दोन वर्षाची रिद्धी आपल्या आईच्या कुशीत होती. ट्रकची धडक लागताच ती हवेत उसळुन ट्रकच्या दोन चाकाच्या मध्ये आली. तिच्या दोन्ही बाजुला ट्रकची चाके होती. थोड्या अंतरावर असल्यामुळे ती बालंबाल बचावली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू