शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भरधाव टेम्पाेने दुचाकीचालकाला चिरडले; लातुरमध्ये बार्शी रस्त्यावर ४५ वर्षीय तरुण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:31 IST

तरुणाची मात्र रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती

राजकुमार जाेंधळे, लातूर: भरधाव आयशर टेम्पाेन एका दुचाकीचालकाला चिरडल्याची घटना लातुरातील बार्शी रस्त्यावर शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ४५ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. त्याला पाेलिसांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल कले. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नाेंद नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील पाच नंबर चाैकातून बारानंबर पाटीकडे भरधाव आयशर टेम्पाे निघाला हाेता. दरम्यान, पाच नंबर चाैकातूनच दुचाकीवरुन ४५ वर्षीय तरुण गावाकडे निघाला हाेता. यावेळी भरधाव टेम्पाेने दुचाकीचालकाला चिरडल्याची घटना घडली. हा अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला. घटनास्थळी रस्त्यावरुन ये-जा करणारे वाहनधारकांनी गर्दी केली हाेती. याची माहिती एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे पाेलिस काॅन्स्टेबल दिपक साेनकांबळे यांना मिळाली. त्यांनी दाेन हाेमगार्डना साेबत घेत घटनास्थळी धाव घेतली.

तातडीने एका वाहनातून तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दुचाकीवरील एक महिला जखमी झाल्याची माहिती असून, ही घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. तरुणाची मात्र रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मात्र अद्याप नाेंद नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघात