शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : कुमार ज्वेलर्सच्या संचालकांच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 12:15 IST

गुंतवणूकदारांची घालमेल : कष्टाची पुंजी गमावल्याने अनेक हवालदिल

कल्याण : ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून ज्वेलर्स पसार होण्याची कल्याण डोंबिवलीतील गेल्या चार वर्षांतील तिसरी घटना आहे. आधीच्या दोन घटनांमध्ये गुडविन आणि प्रथमेश हे डोंबिवलीतील ज्वेलर्स फसवणूक करुन परागंदा झाले. आता कल्याणमध्ये  मे. एस. कुमार ज्वेलर्स फसवणूक करून बेपत्ता झाल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. अनेकांनी आपल्या घरातील मुलींच्या लग्नाकरिता सोन्याचे दागिने घडवण्याकरिता गुंतवणूक केली होती. मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा आली. ज्वेलर्सच्या संचालकांच्या शोधाकरिता पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

रामबाग परिसरातील अविनाश पाटील या तरुणाने आपल्या मिळकतीतून काही रक्कम बचत म्हणून मे. एस. कुमार गोल्ड अँण्ड ज्वेलर्समध्ये गुंतवली होती. ऑक्टोबर २०२० मध्ये त्याने या ज्वेलर्सकडून चेन बनविली होती. तेथील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे ११ महिने पैसे गुंतविल्यास १२ व्या महिन्यात चांगला परतावा मिळेल असे आमिष पाटील यांना दाखवले. डिसेंबर २०२० पासून पाच हजार महिने बचत करण्यास सुरुवात केली. सात महिने पैसे गुंतवले. 

कोरोनाच्या प्रादुर्भावात मार्च-एप्रिलच्या लॉकडाऊनमध्ये दोन महिने दुकान बंद राहिले. परंतु बचत प्रक्रिया सुरूच राहिली. अनलॉकमध्येही कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे कारण देत ज्वेलरने दुकान बंद ठेवले. वॉचमन आम्हाला हीच माहिती देत होता. कालांतराने वॉचमनदेखील गायब झाले. पासबुकवरील दूरध्वनी क्रमांक बोगस निघाल्याने आपली फसवणूक झाल्याची शंका आली. त्यामुळे थेट पोलीस ठाणे गाठले. 

२७ ग्राहकांची तक्रार मे. एस. कुमार ज्वेलर्सच्या संचालकांविरुद्ध आतापर्यंत २७ ग्राहकांनी तक्रार केल्याने मंगळवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर  तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तपासाकरिता विशेष पथकांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याणjewelleryदागिने