शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

अनिल जयसिंघानीला बेड्या! शिर्डीतून गुजरातला पळाला, ओळख लपवून राहिला, पण पोलिसांनी सापळा रचून केली अटक

By मनीषा म्हात्रे | Updated: March 20, 2023 15:20 IST

अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

मुंबई - अमृता फडणवीस लाच प्रकरणात आरोपी असलेल्या अनिक्षा जयसिंघानी हिचे वडील अनिल जयसिघांनी याला गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ७२ तासांपासून अनिल जयसिंघानी पोलिसांना चकवा देत होता. जयसिंघानीच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके काम करत होती. आरोपी शिर्डीतून गुजरातच्या बरदोली इथं गेल्याची माहिती पोलिसांना हाती लागली. त्यानंतर गुजरातमध्ये सापळा रचून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता. गुजरातला पोलिसांची ३ पथके पाठवण्यात आली. आरोपीने पोलिसांना ७२ तास चकवा दिला. त्यानंतर अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि एका नातेवाईकालाही अटक करण्यात आली. जयसिंघानी याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस आणि इंटरनेट वापरण्यासाठी असणारी विविध यंत्रणाही जप्त करण्यात आली. 

अनिल जयसिंघानीला पुढील तपासासाठी मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर आतापर्यंत १४-१५ गुन्हे नोंद आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आरोपी जयसिंघानी हा फरार होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. आरोपी इंटरनेटचा शिताफीने वापर करून अनेकांच्या संपर्कात राहत होता. पोलीस आरोपीची आणखी चौकशी करत आहेत. 

कोण आहे अनिल जयसिंघानी?जयसिंघानी हा सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतला होता. तो एकप्रकारे टोळी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची माहितीही पोलिसांना देत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा २०१५ -१६ मध्येही अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. त्यानंतर, तिच्याशी पूर्णत: संपर्क तुटला. अनिक्षा ही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. ती उच्च शिक्षित आहे.

त्यानंतर २०२१ च्या सुमारास पुन्हा अनिक्षा अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. अमृता फडणवीस यांच्याकडे अनिक्षाने वडिलांची सुटका व्हावी यासाठी १ कोटींची ऑफर दिल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर फडणवीसांना अडकवण्यासाठी सर्व गोष्टींची व्हिडिओ शूटींग अनिक्षाकडून केले जात होते. याबाबत विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.  

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीस