पानीपतमधील एका स्पा सेंटरच्या तरुणींनी एका तरुणाला झोडपल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणींच्या भीतीने या तरुणाने छतावरून उडी मारली. यात त्याता पाय मोडला आहे. या तरुणींनी त्याला इशारे करून वर बोलावले होते. हा तरुण भुलला आणि तिथे गेला. यानंतर त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
तरुणाचा आरोप आहे की या तरुणींनी त्याला हातवारे करून बोलावले होते. या तरुणींनी त्याच्याकडून १५०० रुपयेही काढून घेतले होते. पैसे घेतल्याने त्या तरुणाने स्पामधील तरुणींचा हात धरला. तेव्हा या तरुणींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणींनी देखील या तरुणाने हात पकडला आणि पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
दोन्ही बाजुंनी हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले आहेत. तक्रार दाखल करण्यात आली असून ही संपूर्ण घटना स्पा सेंटरच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रात्रीची ही घटना आहे. स्पा सेंटरच्या तरुणींनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री पहिल्या मजल्यावरील स्पा सेंटरमध्ये एक तरुण आला. त्या स्पा सेंटरच्या गॅलरीत उभ्या होत्या. त्याने तिची पर्स हिसकावली आणि हात धरला. तो गैरवर्तन करू लागला होता. तिने विरोध केला आणि लोक जमा झाले. या भीतीने तरुणाने छतावरून खाली उडी मारली.
तर तरुणाच्या तक्रारीनुसार तो नेपाळचा आहे, बंगळुरुमध्ये इंजिनिअरिंग करत आहे. दुसऱ्या सेमिस्टरसाठी तो पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तो पानिपतला आला होता. दोन महिन्यांपासून अंसल हॉटेलमध्ये काम तो काम करत होता. गुरुवारीच त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता. तसेच नेपाळला जाणार होता. शुक्रवारी त्याचे फ्लाईट होते. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास हॉटेलजवळील एका स्पा सेंटरच्या मुलींनी त्याला त्यांच्याकडे येण्याचा इशारा केला. तो पहिल्या मजल्यावर पोहोचला तेव्हा त्यांच्या शेजारी एक तरुणही उभा होता. मुलींनी त्याच्याकडून १५०० रुपये घेतले. त्याने त्यांचा हात धरला तेव्हा त्यांनी त्याला ढकलले. जेव्हा त्याने त्याचे पैसे मागितले तेव्हा त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली.
त्यांच्या ताव़डीतून सुटण्यासाठी पळून जात असताना रेलिंगला धडकला आणि खाली पडला. त्याच्या पायाचे हाड मोडले. पोलिसांनी तपास सुरु केला असून सीसीटीव्हीत तरुणी त्या तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.