शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या पतीची एन्ट्री होताच 'त्याने' घेतली उडी; बाल्कनीतून खाली पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 06:06 IST

भंडारा येथील घटना, सोमवारी मध्यरात्री महेश भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला.

भंडारा : विवाहित प्रेयसीला भेटायला गेल्यानंतर तिच्या नवऱ्याची अचानक एन्ट्री झाल्याने उडालेल्या गोंधळात अपार्टमेंटच्या बाल्कनीतून उडी घेणाऱ्या तरुणाचा थेट रस्त्यावर पडून मृत्यू झाला. ही घटना भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून भंडारा ठाण्यात तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.महेश वसंतराव डोंगरवार (३६) रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृताचे नाव आहे. 

सोमवारी मध्यरात्री महेश भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. बेडरूममध्ये हे दोघे असताना प्रेयसाच्या पतीची एन्ट्री झाली. त्याने बेडरुमचे दार वाजविले. तेव्हा महेश हातात कपडे पकडून बाल्कनीत पोहचला व बाल्कनीच्या दाराची कडी बाहेरून लावली. आतून दार वाजविण्याचा आवाज येत असल्याने तो गडबडीत खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि थेट सिमेंट रस्त्यावर पडला. त्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. प्रेयसीने भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहे. याघटनेने एकच खळबळ उडाली आहे.