शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:11 IST

Sonam Raghuvanshi : राजाची आई उमा रघुवंशी आता न्याय मागत आहेत. त्यांनी सोनमवर अनेक गंभीर आरोप करत तिची पोलखोल केली आहे.

राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी सोनमसह चार जणांचा अटक करण्यात आली आहे. या घटनेने कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. राजाची आई उमा रघुवंशी आता न्याय मागत आहेत. त्यांनी सोनमवर अनेक गंभीर आरोप करत तिची पोलखोल केली आहे. सोनमच्या खात्यात २० लाख रुपये होते. त्यामुळेच तिने पैशाच्या जोरावर सर्व काही केलं असेल असं राजाच्या आईने म्हटलं आहे. 

उमा रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मी फक्त अशी मागणी करते की, माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. ज्या ज्या लोकांनी माझ्या मुलाला मारलं किंवा त्याच्या हत्येत सहभागी होते, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, शक्य असल्यास त्यांना फाशी देण्यात यावी. सोनमकडे पैशांची कमतरता नव्हती. तिच्या खात्यात २० लाख रुपये होते. तिच्या वडिलांनी स्वतः आम्हाला सांगितलं की त्यांनी खात्यात पैसे टाकले होते. आता तिने हे पैसे त्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सना देण्यासाठी काढले असावेत. तिने जे काही केलं ते पैशांच्या जोरावर केलं." आजतकशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा

नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल

"आम्ही तिला आमची सून नव्हे तर मुलगी मानलं होतं"

"सर्व पुरावे सोनमकडेच बोट दाखवत आहेत. सर्व काही प्लॅनिंग केलं होतं. आतापर्यंत मिळालेल्या सर्व माहितीवरून असं दिसून येतं की, या हत्येमागे सोनमचा हात आहे. लग्न झाल्यावर आम्हाला कधीही वाटलं नाही की, सोनम आनंदी नाही. आम्ही तिला आमची सून नव्हे तर मुलगी मानलं होतं. ती आमच्यासोबत जास्त बसत नव्हती, ती फक्त थोडा वेळ येत असे आणि तिच्या मोबाईलमध्येच गुंतलेली असायची. आम्हाला असंही वाटलं की ती नवीन आहे त्यामुळे तिला आमच्या मिसळण्यास वेळ लागत असेल." 

"माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा

५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी

सोनमने तिकिटं बुक केली

"सोनमच्या कुटुंबाने लवकर लग्नासाठी दबाव आणला होता. सोनमने स्वतः हनिमूनचा संपूर्ण प्लॅन बनवला होता. राजाने मला सांगितलं की आई, सोनमने तिकिटं बुक केली आहेत, आम्हाला दोन दिवसांनी निघायचं आहे. जर सोनमचा बॉयफ्रेंड होता तर तिने त्याच्याशीच लग्न करायचं होतं, तिने माझ्या मुलाचं आयुष्य का उध्वस्त केलं? तिने आम्हाला सांगायला हवं होतं किंवा राजाला सांगायला हवं होतं की तिला लग्न करायचं नाही" असं राजाच्या आईने म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक