शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरच्या लग्नघरात लाखो रुपयांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 05:49 IST

अभिनेत्री सोनम कपूरचा लग्न सोहळा वांद्रे येथील ‘रॉकडेल’ बंगल्यात पार पडला. गेल्या आठवड्यात याच लग्नघरात लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई  - अभिनेत्री सोनम कपूरचा लग्न सोहळा वांद्रे येथील ‘रॉकडेल’ बंगल्यात पार पडला. गेल्या आठवड्यात याच लग्नघरात लाखोंची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोराच्या हालचाली बंगल्याच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वांद्रे पश्चिमेकडील बी. जे. रोड, बँड स्टॅण्डवर अभिनेते अनिल कपूर यांची मेव्हणी आणि सोनमची मावशी कविता सिंग यांचा हा बंगला आहे. याच बंगल्यात सोनमचे लग्न आनंद आहुजा यांच्यासोबत पार पडले. पाच मजल्यांचा हा बंगला असून चौथ्या मजल्यावर सोनमची मावशी कुटुंबासह राहते. सोनमचा मावस भाऊ करण जसजीत सिंग (३९) आणि त्यांची पत्नी नामा हे रात्री १च्या सुमारास चौथ्या मजल्यावरील बेडरूममध्ये झोपले होते. नामा यांना पहाटे ७ वाजता जाग आली. तेव्हा बेडरूमच्या खिडक्यांचे स्लाईड उघडे होते. पैशांची पर्स खाली फेकली होती. बंगल्यातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता एक इसम बेडरूमच्या खिडकीतून बंगल्यात प्रवेश करताना दिसला. चोरी झाल्याचे समजताच वांद्रे पोलिसांत त्यांनी तक्रार केली. मोबाइल, रोकड मिळून २ लाख ७७ हजारांचा ऐवज चोरी झाल्याचा संशय आहे. याच बंगल्यात सोनमच्या लग्नात आलेल्या महागड्या भेटवस्तूही होत्या, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यातील काही चोरीला गेल्याचा संशय आहे. या चोराचा शोध वांद्रे पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी