शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Sonali Phogat Murder Case: सोनाली फोगाट: हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा प्रमोद सावंतांना फोन; आज मोठा निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 11:51 IST

सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे. 

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात तिचा पीए आणि ड्रग सेवन हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. हार्ट अॅटॅक आता हत्येत बदलू लागला आहे. सोनालीच्या भावाने पीए सुधीर सांगवानवर बलात्कार, लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप लावले होते. तेव्हापासून सोनालीचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय बळावू लागला होता. 

Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

सोनाली प्रकरणी तिचा पीए, मित्र, कर्ली क्लबचा मालक, सोनाली राहत होती त्या हॉटेलचा कर्मचारी व त्याला ड्रग पुरविणारा ड्रग पेडलर अशा पाच जणांना अटक झाली आहे. सोनालीची हत्या ही तिची संपत्ती हडप करण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे. सोनालीला ड्रग पाजल्याचे पीए आणि तिच्या मित्राने पोलीस चौकशीत कबुलही केले आहे. 

या साऱ्या प्रकरणावर अखेर हरियाणाचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांच्यात आज फोनवर चर्चा झाली आहे. याची माहिती गोव्याचे सीएम प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मनोहर लाल खट्टर यांनी सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सावंतांकडे केली आहे. खट्टर यांना सोनालीचे कुटुंबीय भेटले होते, त्यांनीच ही मागणी केल्याचे खट्टर म्हणाले. यावर मला काही समस्या नाहीय. मी गरज पडली तर आजच सर्व प्रक्रिया पूर्ण करून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवेन, असे सावंत म्हणाले. 

पोलिसांनी कर्ली क्लबच्या बाथरुममधून काल दीड ग्रॅम ड्रग जप्त केले होते. ते मेथॅम्फेटामाइन असल्याचे समोर आले आहे. सोनालीचा पीए सुधीर सांगवानने ते ड्रग पेडलरकडून घेतले आहे. गोवा पोलिसांनी काल रात्री आणखी एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. क्लब मालक एडविन न्यून्स यालाही अटक करण्यात आली आहे. पहिला ड्रग पेडलर हा सोनाली ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, त्या हॉटेलचाच कर्मचारी आहे. सांगवान आणि त्याने ड्रगची देवानघेवाण केल्याचे कबूल केले आहे.  सोनालीली मेथॅम्फेटामाइन पाण्यातून देण्यात आले होते. 

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटPramod Sawantप्रमोद सावंतHaryanaहरयाणा