शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 09:45 IST

Sonali Phogat Drug Name: एकदा का कोणी ते घेतले की त्याचे झटकन व्यसन लागते. कारण ते मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते.

भाजपा नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाटच्या मृत्यूने सारे इंटरनेट हादरविले आहे. रोज तिच्या मृत्यूबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता तर तिला काहीतरी पाजतानाचा व्हिडीओ समोर येत आहे. यामध्ये ती देखील नाचताना सांगवान पाजत असलेल्या बॉटलमधील द्रव्य पित आहे. 

पोलिसांनी कर्ली क्लबच्या बाथरुममधून काल दीड ग्रॅम ड्रग जप्त केले होते. ते मेथॅम्फेटामाइन असल्याचे समोर आले आहे. सोनालीचा पीए सुधीर सांगवानने ते ड्रग पेडलरकडून घेतले आहे. गोवा पोलिसांनी काल रात्री आणखी एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. क्लब मालक एडविन न्यून्स यालाही अटक करण्यात आली आहे. पहिला ड्रग पेडलर हा सोनाली ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, त्या हॉटेलचाच कर्मचारी आहे. सांगवान आणि त्याने ड्रगची देवानघेवाण केल्याचे कबूल केले आहे. 

Methamphetamine काय आहे...नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अ‍ॅब्युज (NIDA) नुसार, मेथॅम्फेटामाइन हे अत्यंत घातक आणि शक्तिशाली औषध आहे. एकदा का कोणी ते घेतले की त्याचे झटकन व्यसन लागते. कारण ते मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते. मेथॅम्फेटामाइन हे काचेच्या भुश्या सारखे दिसते. हे औषध रासायनिकदृष्ट्या अॅम्फेटामाइनसारखेच असते. अॅम्फेटामाइनचा उपयोग अटेंशन डेफिसिट हायपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) आणि नार्कोलेप्सी, झोपेचा विकार यावर उपचार करण्यासाठी औषध म्हणून केला जातो. सोनालीली मेथॅम्फेटामाइन पाण्यातून देण्यात आले होते. 

मेथॅम्फेटामाइन या औषधामुळे मेंदूतील डोपामाइनचे प्रमाण वाढते. डोपामाइन एक न्यूरोट्रांसमीटर आहे. मेंदूतील चेतापेशींमधील सिग्नल पाठवणारे रसायन. डोपामाइन मेंदूच्या फील गुड घटकासाठी देखील जबाबदार आहे, जो तुमचा मूड चांगला ठेवण्यास मदत करतो. जेव्हा हा व्यक्ती आपल्या आवडत्या गोष्टीच्या संपर्कात असतो, तेव्हाच हे औषध मेंदूमध्ये काम करण्यास सुरुवात करते. यामुळे हा व्यक्ती आनंद घेण्यास सुरुवात करतो. मग तो शरीर संबंध असो की अन्य कोणताही. डोपामाइन शरीराच्या हालचाली, प्रेरणा आणि वर्तनात अनेक बदल घडवून आणते. डोपामाइन एक रासायनिक संदेशवाहक असल्याचे म्हटले जाते जे मेंदूला अनेक गोष्टी करण्यास प्रवृत्त करते. यामुळे त्या व्यक्तीचा त्याच्या अवयवांवर कंट्रोल राहत नाही, त्याचे अवयव जसे सांगतात तसे त्यांचा मेंदू ऐकत जातो आणि कृती करायला लागतो. 

याच मेथॅम्फेटामाइनचा ओव्हरडोस झाला तर ते विष म्हणून काम करू लागते आणि त्या व्यक्तीला स्ट्रोक किंवा हार्ट अॅटॅक येऊ शकतो. सोनालीच्या बाबतीत नेमके हेच झाले. तिला हार्ट अॅटॅक आला पण तो या ड्रगमुळे. आता हे ड्रग तिला कशासाठी देण्यात आले होते हे पोलीस शोधत आहेत.  

टॅग्स :Sonali Phogatसोनाली फोगाटDrugsअमली पदार्थ