शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सूडाची भावना! लहानपणी आई-बाबांनी बोर्डिंग स्कूलला पाठवलं; लेकाने 40 वर्षांनी 'असा' घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:24 IST

11 व्या वर्षी एडला पालकांनी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले होते. यामुळे तो आई-वडिलांवर रागावला होता. बदला घेण्यासाठी 40 वर्षांनंतर त्याने आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. 

ब्रिटनमध्ये एका व्यक्तीने आपल्या पालकांवर जीवघेणा हल्ला केला. एड लिनसे असं या 51 वर्षीय व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, वयाच्या 11 व्या वर्षी एडला त्याच्या पालकांनी बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले होते. यामुळे तो आई-वडिलांवर चांगलाच रागावला होता. बदला घेण्यासाठी आता 40 वर्षांनंतर त्याने आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला आहे. 

एड लिनसे हा एक अयशस्वी व्यापारी असून त्याच्यावर त्याच्या वडिलांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप याआधीही ठेवण्यात आला होता. मेट्रो न्यूजच्या रिपोर्टनुसार, एड लिनसे याने 22 एप्रिल रोजी मध्यरात्री चेशायरमध्ये पालकांच्या 1.2 मिलियन पाउंडच्या फार्महाऊसमध्ये घुसला आणि त्याने 85 वर्षीय वडील निकोलस क्लेटन आणि 82 वर्षीय आई ज्युलिया यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

याहू न्यूजनुसार, लिनसेने त्याच्या वडिलांवर बेडरूममध्ये हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, कानाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर तो त्याची आई असलेल्या खोलीत गेला आणि तिच्या डोक्यावर वार केले आणि तिच्या पाठीवर याची जखम आहे. 1980 मध्ये त्याला ऑल-बॉईज पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आले होते. येथे त्याचा खूप छळ करण्यात आला. या गोष्टीचा त्याला राग होता आणि त्यामुळे त्याला आपल्या आई-वडिलांकडून बदला घ्यायचा होता अशी माहिती त्याने दिली. 

एडच्या पालकांच्या वकिलाने कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरी बोर्डिंग स्कूलमध्ये काय घडले याचा कधीही उल्लेख केला नाही. आई सांगते की एडची आमच्याबद्दल खूप दिवसांपासून कटुता होती. असे असतानाही त्यांनी आरोपीशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला नेहमीच आर्थिक मदत केली. पालकांचे म्हणणे आहे की, एडचा असा विश्वास होता की बोर्डिंग स्कूलमध्ये त्याला झालेल्या त्रासाची पालकांनी भरपाई केली पाहिजे. सध्या या प्रकरणात न्यायालयाने आरोपी एडला त्याच्या आई-वडिलांवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी