फगवारा (पंजाब) : एका खासगी विद्यापीठातील मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रे फेसबुक व इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्या पितापुत्राला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार पंजाबत्या कपुरतळा जिल्ह्यात फगवारा या शहरात घडला.जसविंदर बेदी आणि यतीन बेदी अशी या पितापुत्रांची नावे आहेत. ते मूळचे लुधियानातील हैबोवल काळन येथील आहेत. याबाबत तीन मुलींना तक्रार दिली होती. यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. ही दुकलीने या मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रे बनवाट आयटीच्या साह्याने सोशल मीडियावर अपलोड केली होती. भादविची विविध कलमे आणि पोस्को कायद्याअंतर्गत या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अद्याप अटक झाली नसून पोलीस तपासाची प्रक्रिया पूर्ण करीत आहेत. (वृत्तसंस्था)
मुलींची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करणारे पितापुत्र ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 23:35 IST