शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०० वर्षे जुन्या ज्वेलर्सवरील प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामध्ये सापडले असे काही, अधिकाऱ्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:48 IST

Income Tax Raid News: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये चौक सराफा स्थित १०० वर्षे जुने सराफा दुकान असलेल्या केदारनाथ श्रीकृष्ण ज्वेलर्स आणि केएस बुलियनच्या चार शाखा, कारखाना, ऑफिस, शोरूम आणि निवास्थानावर प्राप्तिकर विभागाने रविवारी छापे मारले होते.

कानपूर -  उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये चौक सराफा स्थित १०० वर्षे जुने सराफा दुकान असलेल्या केदारनाथ श्रीकृष्ण ज्वेलर्स आणि केएस बुलियनच्या चार शाखा, कारखाना, ऑफिस, शोरूम आणि निवास्थानावर प्राप्तिकर विभागाने रविवारी छापे मारले होते. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाच्या तीन टीमचा तपास रविवारी रात्री आणि दुसऱ्या टीमचा तपास सोमवारी संध्याकाळी संपला. यादरम्यान तेथून ८.५ कोटी रुपयांची बेहिशोबी चांदी जप्त करण्यात आली. तसेच १६ लाख रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. याशिवाय काही लॉकरही सीझ करण्यात आले.

या फर्मचे मालक बॉबी अग्रवाल आणि सीए संजय अग्रवाल यांच्या घरावर सोमवारी संध्याकाळपर्यंत तपासाची कारवाई सुरू होती. या छाप्यात ८.५ कोटी रुपयांची बेहिशोबी चांदी जप्त करण्यात आली. या चांदीबाबत कुठलीही कागदपत्रे मिळाली नाहीत. जप्त करण्यात आलेली १५०० किलो चांदी ही वस्तूच्या रूपात सापडली आहे. या छाप्यामध्ये विविध संपत्तींची कागदपत्रेही सापडली आहेत. मात्र यामधील बहुतांश जुनी संपत्ती आहेत.

दरम्यान, फर्मच्या तपासामध्ये पर्चेज रसिस्टर तसेच सेल रजिस्टर मिळालेलं नाही. तसेच स्टॉक रजिस्टर आणि मेंटेनन्स रजिस्टरही मिळालेलं नाही. दरम्यान, संपूर्ण नोंदवही ही ५० वर्षे जुन्या रोकडच्या रूपात मिळाली तेव्हा  प्राप्तिकर अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. सगळीकडे इंटरनॅशनल अकाऊंट सिस्टिमचा जमाना आला असताना अजूनही या फर्मचा हिशेब हा आजही मुनीमजींच्या माध्यमातून रोकडच्या रूपात ठेवला जात होता. आता प्राप्तिकर विभागाकडून त्याची चाचपणी केली जात आहे.

केदारनाथ श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक स्वत: चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. केएस ब्रँड नावाने त्यांची चांदीची भांडी बाजारात विकली जातात. हा ब्रँड उत्तर प्रदेशमधील टॉप-३ ब्रँडमधील एक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही त्यांच्या चांदीच्या भांड्यांना खूप मागणी आहे. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या व्यवसायाचा हिशोब जुनाट पद्धतीने ठेवला जात असल्याने अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCrime Newsगुन्हेगारी