शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये इंजिनिअरनं संपवलं आयुष्य; कहाणीत ट्विस्ट आला अन् गर्लफ्रेंडला झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:21 IST

पोलीस मृत उमेशचा मोबाईल तपासत आहे. इरमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा मित्र संतोष त्याचा शोध सुरू आहे.

नोएडाच्या सेक्टर २७ इथं एका हॉटेलमधील इंजिनिअरच्या आत्महत्येत नवा ट्विस्ट समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी मृत इंजिनिअरची गर्लफ्रेंड हिला अटक केली आहे. ती मथुराची रहिवासी असून नोएडात बीबीएचं शिक्षण घेत आहे. या दोघांची भेट २ वर्षापूर्वी एका डेटिंग APP वर झाली होती. १० एप्रिलला इंजिनिअरने हॉटेलच्या रूमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड आणि पाळीव श्वानही तिथेच होता. सध्या पोलीस या युवतीची चौकशी करत आहेत.

मृत इंजिनिअरचं नाव उमेश असून तो हाथरसचा रहिवासी होता. तो विवाहित असून त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाचा वाद सुरू आहे. मृतकाच्या भावाने केलेल्या तक्रारीनुसार, गर्लफ्रेंड आणि तिचा एक सहकारी भावाचा आर्थिक आणि मानसिक छळ करत होते. उमेश आणि त्याची गर्लफ्रेंड २ वर्ष सहमतीने सोबत राहत होते. ते दोघे कुत्र्‍याच्या उपचारासाठी नोएडला गेले होते. त्यात या दोघांमध्ये वाद झाला असं त्याने सांगितले. उमेशच्या गर्लफ्रेंडचं नाव इरम असं आहे. 

पोलीस चौकशीत तिने सांगितले की, मी आणि उमेश दोघांची भेट २ वर्षापूर्वी एका डेटिंग APP वर झाली होती. आमच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. १० एप्रिलला दोघेही पाळीव श्वानाच्या उपचारासाठी नोएडाला आलो होतो. तिथे वेमेशन ओयो हॉटेलमध्ये खोली बुक केली. दोघांनी एकत्रित जेवण केले असं सांगितले. कुत्र्‍याच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर इरम वॉशरूमला गेली, जेव्हा ती परतली तेव्हा उमेशने गळफास घेतला होता असं तिने पोलिसांना सांगितले.

तर इरम आणि संतोष नावाचा एक व्यक्ती माझा भाऊ उमेशला ब्लॅकमेल करत होते. भावाकडून गर्लफ्रेंड इरमने वेळोवेळी पैसे घेत ३० लाख रूपये हडपले होते. जेव्हा उमेश त्या पैशांची मागणी करत होता तेव्हा त्याचा मानसिक छळ करण्यात आला. उमेशला इतके छळले की तो कुणालाही याबाबत काही बोलला नाही. उमेश वर्क फ्रॉम होम करायचा. इरम त्याला भेटायला हॉटेलला येत होती. उमेशला श्वान खूप आवडायचा त्यामुळे त्याच्या उपचारावरून वाद होऊ शकत नाही. पोलीस मृत उमेशचा मोबाईल तपासत आहे. इरमला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा मित्र संतोष त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी