शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

…म्हणून महिलेने उकळत्या तेलात बुडवला ११ वर्षीय मुलीचा हात, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 23:51 IST

Crime News:  गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एका महिलेने ११ वर्षींय मुलीला क्रूर शिक्षा दिल्याचे समोर आले आहे. या महिलेने शेजारच्या ११ वर्षीय मुलीचा हात उकळत्या तेलात बुडवला.

अहमदाबाद -  गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एका महिलेने ११ वर्षींय मुलीला क्रूर शिक्षा दिल्याचे समोर आले आहे. या महिलेने शेजारच्या ११ वर्षीय मुलीचा हात उकळत्या तेलात बुडवला. ही मुलगी खोटं बोलतेय की नाही याची खातरजमा करण्यासाटी या महिलेने या मुलीचा हात उकळत्या तेलात टाकला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आरोपी लखी मकवाना हिला अटक केली आहे. ही घटना बुधवारी पाटणमधील संतालपूर शहरात घडली. (the woman dipped the hand of an 11-year-old girl in boiling oil)

गुजरात राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा जागृतीबेन पंड्या यांनी डीएमकडे या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे. घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये पीडितेचा उजवा हात जळाल्याचे आणि ती रडत रडत घडलेली घटना सांगत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. 

जागृतीबेन पंड्या यांनी माध्यमांना सांगितले की, पाटन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे मला सांगण्यात आले आहे. मी आपल्या जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्याला सूचना केली आहे की, पीडितेच्या घरी जावा आणि तिच्यावरील उपचारांचा आढावा घ्या. मी जिल्हाधिकाऱ्यांनाही आपल्या परीने तपास करण्याचे आणि रिपोर्ट देण्याची सूचना दिली आहे. 

संतालपूर ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर एनडी परमार यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हल्ला आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, तपासामधून समजले की, महिला आणि पीडित मुलीचे कुटुंब हे शेजारी आहेत. तसेच दहा दिवसांपूर्वी मुलीने घराबाहेर या महिलेला एका अज्ञात व्यक्तीसोबत बोलताना पाहिले होते.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात