शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पत्नीनेच आवळला पतीच्या प्रेयसीचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 08:27 IST

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीतून नाल्यात, कुर्ला येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून २५ वर्षीय पत्नीनेच बहीण आणि मैत्रीणीच्या मदतीने पतीच्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकल्याची खळबळजनक घटना कुर्ला येथे घडली आहे. या हत्याकांडाची उकल करत नेहरूनगर पोलिसांनी तिन्ही महिलांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेहरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ ऑक्टोबरला मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बंदर भवनासमोरील नाल्यात एक संशयास्पद गोणी पडल्याचा संदेश प्राप्त झाला. नेहरूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोणीची तपासणी केली. त्यात  एका महिलेचा कुजलेला मृतदेह त्यांना आढळला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. शवविच्छेदन अहवालात महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कुर्ला पूर्वेकडील नवजीवन रहिवासी संघ येथून दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी मीनल पवार (२५) हिने तिच्या पतीचे मृत महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून बहीण शिल्पा पवार (२५) आणि मैत्रीण प्रज्ञा उर्फ डॉली भालेराव (२५) यांच्या मदतीने कट रचून मृत महिलेची १ ऑक्टोबरच्या पहाटे अडीज वाजता हत्या केली. 

असा रंगला हत्येचा थरार...प्रेम संबंधाच्या रागातून मीनलची मैत्रीण डॉली हिने प्रेयसीला माहुल गाव येथील घरी घरी ठेवले. त्यानुसार, ३० सप्टेंबर रोजी मीनल तिची बहीण शिल्पा पवारने डॉलीचे घर गाठले. तिघींनी त्या महिलेला इमारतीच्या टेरेसवर नेऊन दोन्ही हात पकडून, केस ओढून, तिला मारहाण केली. शिल्पा हिने तिचा स्कार्प काढून मीनलकडे दिला. मीनलने स्कार्फच्या सहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा जीव गेल्याची खात्री झाल्यावर तिला एका गोणीतून डॉलीच्या घराच्या जवळून खेचतच रिक्षातून नाल्यात फेकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी