शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

...म्हणून नवाज शरीफ यांना परदेशात उपचारासाठी नाही जाता आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 17:40 IST

आज सकाळी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनला जाणार होते.

ठळक मुद्देनवाज शरीफ यांनी शुक्रवारी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबियांच्या आग्रहास्तव   उपचारासाठी ब्रिटनला जाण्यास तयार झाले होते.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या लिस्टमधून त्यांचे नाव हटविले जाईल असं आश्वासन दिले आहे.  

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधाननवाज शरीफ यांना उपचारासाठी लंडनला जाण्याची शक्यता कमी वाटत आहे. कारण सरकारने फ्लाय लिस्टमधून नवाज शरीफ यांचं नाव हटविले आहे. ज्या व्यक्तीचे नाव फ्लाय लिस्टमधून हटविले जाते ती व्यक्ती देशात अथवा देशाबाहेर विमानाने प्रवास करू शकत नाही. ६९ वर्षाचे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे (पीएमएल - एन) अध्यक्ष नवाज शरीफ यांनी शुक्रवारी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबियांच्या आग्रहास्तव   उपचारासाठी ब्रिटनला जाण्यास तयार झाले होते. त्यानंतर आज सकाळी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनला जाणार होते.एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार नवाज शरीफ यांचे नावफ्लाय लिस्टमधून काढून टाकू शकत नाहीत. कारण, एनबीएचे अध्यक्ष एनओसी देण्यासाठी नाहीत. ते पुढे म्हणाले की, एनबीएच्या अधिकाऱ्यांनी शरीफ यांचे वैद्यकीय अहवाल मागविले आहेत. मात्र,  हे विशेष प्रकरण असून म्हणूनच सरकार नवाज यांचं नाव नो फ्लाय लिस्टमधून हटवू शकते. शरीफ यांच्या या प्रकरणी सोमवारी म्हणजेच उद्या विचार केला जाईल. याआधी शरीफ यांना रविवारी सकाळी भाऊ शाहबाज शरीफसोबत जाणार असल्याचे पीएमएल - एनच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. पुढे ते म्हणाले, "शरीफ यांचे नक्की नो फ्लाय लिस्टमध्ये नाव आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या लिस्टमधून त्यांचे नाव हटविले जाईल असं आश्वासन दिले आहे.  

भ्रष्टाचार प्रतिबंधक राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायालयाने (नॅब) शरीफ गजाआड केले. चौधरी साखर कारखान्यात नवाज यांची मुलगी मरियम नवाज या महत्त्वाच्या भागधारक आहेत. कोट्यवधी रुपयांची त्यांनी यात गुंतवणूक केली आहे. त्यांच्याद्वारे मोठ्या रकमेचे बरेच व्यवहार झाले आहेत. नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून याप्रकरणी ते लाहोरमधील कोटलखपत तुरूंगात शिक्षा भोगत होते. गेल्या सोमवारी नवाझ शरीफ तरूंगात असताना प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील रक्तपेशी कमी झाल्याने नवाझ शरीफ यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु होते. प्रकृतीच्या कारणास्तव नवाज यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानMedicalवैद्यकीयLondonलंडन