शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कहर! …म्हणून तो मंदिरांच्या दानपेटीमध्ये टाकायचा वापरलेले कंडोम, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:36 IST

Crime News: मंदिरांच्या दानपेट्यांमध्ये वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका विकृत व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव Devdas Desai असून, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने असे कृत्य करण्यामागच्या धक्कादायक कारणाचा उलगडा केला आहे.

बंगळुरू - मंदिरांच्या दानपेट्यांमध्ये वापरलेले कंडोम टाकणाऱ्या एका विकृत व्यक्तीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव देवदास देसाई असून, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने असे कृत्य करण्यामागच्या धक्कादायक कारणाचा उलगडा केला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, येशूचा संदेश पोहोचवण्यासाठी तो असे कृत्य करत असे. तसेच या कृत्याचा आपल्याला कुठलाही पश्चात्ताप नसल्याचेही त्याने सांगितले आहे. पोलीस गेल्या वर्षभरापासून या आरोपीचा तपास करत होते. मंदिरातील दानपेट्यांमध्ये वापरलेले कंडोम टाकून तो फरार होत असे.

याबाबत समोर आलेल्या वृत्तानुसार ६२ वर्षीय आरोपी देवदास देसाई हा मंगळुरूमधील अनेक मंदिरांमध्ये जाऊन असे कृत्य करून आला आहे. बऱ्याच काळापासून पोलीस त्याच्या शोधात होते. मात्र तो नेहमीच पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार होत असे. गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी कोरज्जाना कट्टे गावातील एका मंदिरातील दान पेटीमध्ये वापरलेला कंडोम टाकल्याची घटना घडली होती. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान अखेर आता तो पोलिसांच्या जाळ्यात पोहोचला आहे.

अशा प्रकारची घटना घडल्यानंतर पोलिसांनी मंदिर आणि आसपासच्या परिसरातील कॅमेरे तपासले. जेव्हा अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यामध्ये आरोपीचा चेहरा दिसून आला. त्याआधारावर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीमध्ये देवदास देसाई याने त्याने अशाप्रकारे अनेक मंदिरांना अपवित्र केल्याचे कबुल केले होते. आरोपीने सांगितले की, त्याने एकूण १८ मंदिरांमध्ये असं विकृत कृत्य केलं आहे. मात्र यापैकी केवळ पाच पाच मंदिरांकडून पोलिसांना तक्रारी मिळाल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जबाबामध्ये सांगितले की, मंदिरांमध्ये तो यासाठी कंडोम फेकायचा जेणेकरून ती अपवित्र होऊन लोक आपल्या धर्माकडे आकृष्ट व्हावेत, हा त्याचा हेतू होता. केवळ मंदिरच नाही तर मशिदी आणि गुरुद्वारामध्येही त्याने अशाप्रकारे कंडोम फेकले होते. दरम्यान, केलेल्या कृत्याचा आरोपीला कुठलाही पश्चाताप नाही आहे. त्याने सांगितले की, तो केवळ येशूच्या शिकवणीचा प्रसार करत होता. आरोपीने सांगितले की, बायबल सांगते की येशूशिवाय अन्य कुणीही ईश्वर नाही आहे. तसेच अशुद्ध वस्तू ह्या अपवित्र ठिकाणीच टाकाव्यात म्हणून मी कंडोम मंदिरांमध्ये फेकत असे, असेही त्याने सांगितले.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटक