शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणातून मित्रावरच कटरने वार; चौघांवर गुन्हा दाखल

By परिमल डोहणे | Updated: May 28, 2023 23:36 IST

निसार खान व नवशाद शेख हे मित्र होते.

चंद्रपूर : क्षुल्लक कारणातून मित्रावरच कटरने वार करून जखमी केल्याची घटना लालपेठ परिसरातील मोहम्मदिया वॉर्डात शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. दोन्ही गटांतील तरुणांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला आहे. 

पोलिसांनी निसार खान (३५), शहनवाज शेख (३०) या दोघांवर कलम ३२६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर, जखमी नवशाद शेख, शेख हबीब यांच्यावर कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निसार खान व नवशाद शेख हे मित्र होते. निसारला लकवा मारल्याने तो अपंग झाला आहे. निसारची पत्नी काही कारणास्तव रागावून माहेरी गेली आहे. तिची समजूत काढण्यासाठी निसारने नवशादला सांगितले. यावेळी तुमचा फॅमिली मॅटर तुम्ही बघा, असे नवशाद निसारला म्हणाला. याचा निसारला राग आला होता. शुक्रवारी ते एका कार्यक्रमाप्रसंगी सामोरासामोर आले. यावेळी याच कारणावरून त्याच्यात वाद झाला. 

यावेळी दोघांत झटापट झाली. निसारने नवशादवर कटरने वार केला. तर, नवशादचा भाऊ मदतीला धावला. त्यानेही मारहाण केली. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी केल्या. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रमिज मुलानी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी