हैदराबाद : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्स-लेनिन) (जनशक्ती गट) सहा नक्षलवाद्यांना सोमवारी राजान्ना सिरसिला जिल्ह्यात अटक करण्यात आली. शस्त्रास्त्रे बाळगणे आणि खंडणी वसूल करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे, असे पोलिसांनी सांगितले.मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून पोलिसांच्या तुकडीने त्यांना थांगल्लापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले.चौकशीत या सहा जणांनी भाकप (एमएल) जनशक्ती रामचंद्रम पार्टी ग्रुपमध्ये त्यांच्याकडे वेगवेगळी पदे असल्याचे सांगितले, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राहुल हेगडे यांनी दिली. नक्षलवाद्यांकडून देशी बनावटीच्या दोन रिव्हॉल्व्हर्स, पाच रिव्हॉल्व्हर्स राऊंडस्, सहा मोबाईल फोन्स आणि दोन दुचाकी वाहने तसेच पक्षाचे लिखित साहित्य जप्त करण्यात आले. अटक झालेल्यांची वये २६-५६ आहेत. हे नक्षलवादी लोकांना धमक्यांची पत्रे पाठवून खंडणी वसूल करायचे.
तेलंगणमध्ये सहा नक्षलवाद्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 00:54 IST