शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्केस्ट्रा बारमधील छुप्या खोलीतून सहा बारबाला सापडल्या पोलिसांच्या जाळ्यात   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 19:32 IST

Six Barbaras were found in a police trap : बारमध्ये गाण्याच्या तालावर बारबालांकडून अश्लील नृत्य करवून घेत असल्याची माहिती व्हिडीओ क्लिपद्वारे मिळाली.  

ठळक मुद्देखोलीच्या संरचनेत बदल करून तयार केलेल्या ७ फूट लांब आणि ४.५ रुंद अश्या छुप्या खोलीत दाटीवाटीने लपवलेल्या ६ बारबालांना अग्निशमन दलाच्या साहाय्याने बाहेर काढले. 

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानक समोरील मिड लाईफ या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिस उपायुक्त परिमंडळ १ च्या पथकाने धाड टाकून आतील छुपी खोली तोडून लपवलेल्या  सहा बारबाला बाहेर काढल्या. मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे यांना मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये गाण्याच्या तालावर बारबालांकडून अश्लील नृत्य करवून घेत असल्याची माहिती व्हिडीओ क्लिपद्वारे मिळाली.  

 

काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तूसाहेब लोंढे सह विनायक मगर, अजय मांडोळे, जितेंद्र उथळे, विनोद चव्हाण,  विजेता नाईक यांच्या पथकाने रात्री धाड टाकली. मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पथकाने मेकअप रूमचा काचेचा आरसा असलेल्या खोलीच्या संरचनेत बदल करून तयार केलेल्या ७ फूट लांब आणि ४.५ रुंद अश्या छुप्या खोलीत दाटीवाटीने लपवलेल्या ६ बारबालांना अग्निशमन दलाच्या साहाय्याने बाहेर काढले. 

 

बारबालाच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी तसेच अन्य कलमांखाली नवघर पोलीस ठाण्यात बारचा चालक - मालक, ११ ग्राहक, १० बार कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Policeपोलिसbhayandarभाइंदरdanceनृत्य