शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या अंगावर मोटार घालून केली हत्या, सहा आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:24 IST

Crime News : किरकोळ वादातून एका व्यक्तीवर चार चाकी गाडी घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

डाेंबिवली : किरकोळ वादातून एका व्यक्तीवर चार चाकी गाडी घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या साहाय्याने मानपाडा पोलिसांनी आजदे गावातील सहा आरोपींना अटक केली आहे.डोंबिवली एमआयडीसीतील एका कॅन्टीनमध्ये काही तरुण पार्टी करण्यासाठी बसले होते. पेंडसेनगर येथे राहणारा शशांक महाजन त्याच्या एका मित्रासोबत पार्टीत सहभागी झाला होता. त्या वेळी एका तरुणाशी त्याचा वाद झाला. या वादानंतर शशांक आपल्या मित्रासोबत घरी जाण्यासाठी निघाला. त्याने घरी जाण्यासाठी ओला बुक केली. मात्र ओला वेळेवर आली नाही. त्यामुळे शशांक व त्याचा मित्र दोघे पायी घराकडे निघाले. ज्या तरुणासोबत शशांकचा वाद झाला होता. ते तरुण लाल रंगाच्या मोटारीमध्ये बसून शशांकच्या मागे आले. अगोदर शशांकला वाटले की, ही त्याने बुक केलेली ओला आहे. त्या मोटारीतून आलेल्या सहा तरुणांनी शशांक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करून शशांकला रस्त्यावर पाडले. त्यानंतर चार चाकी गाडी त्याच्या डोक्यावर घातली. त्यानंतर ते पळून गेले. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी संतोष डांबरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शशांकला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. परंतु त्यापूर्वीच शशांकचा मृत्यू झाला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्ह्याचा उलगडाएका ठिकाणी लागलेल्या सीसीटीव्हीत लाल रंगाची गाडी जाताना दिसली. या गाडीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून घटनेनंतर तीन तासांच्या आत आरोपी सचिन पाटील, विनोद म्हात्रे, विनय लंके, निखिल सावंत, विक्रांत तांडेल आणि रोहित गुरव यांना बेड्या ठोकल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनdombivaliडोंबिवली