शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

नागपुरातील कुख्यात कडवविरुद्ध सीताबर्डीतही गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 21:00 IST

रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या कुख्यात गुंड मंगेश कडवविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून सहा लाख रुपये हडपणाऱ्या कुख्यात गुंड मंगेश कडवविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नोकरीचे आमिष दाखवून कडव याने अनेकांची फसवणूक केल्याचे आणि सीताबर्डी ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसापासून ‘लोकमत’ने प्रकाशित केले आहे, हे येथे विशेष उल्लेखनीय !किशोर फुलचंद तलाठी (वय ६२) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. ते धरमपेठ येथील लक्ष्मीभुवन चौकाजवळ राहतात. ते पानटपरी चालवितात. आयुष्यभर काटकसर करून त्यांनी काही रक्कम जमा केली होती. आरोपी मंगेश कडवसोबत ओळख झाल्यानंतर तलाठी यांनी कडवला आपला मुलगा बेरोजगार आहे, कुठे तरी लावून द्या, अशी विनंती केली. कडवने तलाठी यांचा मुलगा राजकुमार याला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, अशी थाप मारली. त्यानुसार २८ एप्रिल २०२० ला तलाठी यांच्याकडून ६ लाख रुपये घेतले. ही रक्कम घेतल्यानंतर मुलाला रेल्वेत नोकरी मिळेल या आशेने तलाठी आरोपी कडवसोबत रोज संपर्क साधत होते. सुरुवातीला वेगवेगळे कारण सांगून टाळाटाळ करणाºया कडवने नंतर त्यांना धमकावणे सुरू केले. अलीकडे तलाठी यांना कडवचा संशय येऊ लागला. तो नोकरी लावून देणार नाही, याची खात्री पटल्यामुळे त्यांनी कडवला आपली रक्कम परत मागितली असता आरोपीने तलाठी यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कुणाला काही सांगितल्यास गंभीर परिणाम होतील, असेही धमकावले. त्याच्या गुंडगिरीमुळे तलाठी गप्प बसले. तिकडे कडवच्या पापाचा बोभाटा झाल्यामुळे आणि पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केल्यामुळे तलाठी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी सीताबर्डीचे ठाणेदार जगवेंद्र राजपूत यांच्याकडून तलाठी यांच्या तक्रारीची शहानिशा करून घेतली आणि सोमवारी उशिरा रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.रुचिता कडवला पोलीस कोठडीदरम्यान, २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखेने सोमवारी मंगेश कडवची पत्नी रुचिता हिला अटक केली. तिला आज न्यायालयात हजर करून पोलिसांनी तिचा एक दिवसाचा पीसीआर मिळविला.कडववर चोहोबाजूंनी दबावफरार असलेल्या मंगेश कडव याच्याविरुद्ध दाखल झालेला सीताबर्डीतील पाचवा गुन्हा होय. यापूर्वी त्याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर आणि हुडकेश्वर ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हुडकेश्वरच्या गुन्ह्यात त्याची पत्नीही आरोपी आहे. तिला अटक करून पोलिसांनी मंगेश कडववर मोठा दबाव निर्माण केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी