शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर काही दिवसांतच दिराच्या प्रेमात पडली वहिनी, एकत्र येणे अशक्य झाल्यावर उचललं टोकाचं पाऊल आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:28 IST

Crime News: अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, असं म्हटलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला पती असतानाही दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली. नात्यांच्या मर्यादा ओलांडत त्यांनी एक होण्याचा निर्णय घेतला. मात्र...

पाटणा - अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, असं म्हटलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील  एक महिला पती असतानाही दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली. नात्यांच्या मर्यादा ओलांडत त्यांनी एक होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या या प्रेमप्रकरणाची खबर दिल्लीत राहत असलेल्या या महिलेच्या पतीला समजली आणि वादाला सुरुवात झाली. कुटुंबीयांनी या प्रेमप्रकरणाला विरोध कऱण्यास सुरुवात केली. मात्र एकमेकांसोबत जगण्यामरण्याच्या शपथा खाल्लेले हे दोघेही घरातून पळून गेले. मात्र दीड महिन्यापूर्वी गाव सोडलेल्या या जोडप्याला एकत्र राहणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत मरण्याची शपथ घेऊन स्टेशनवर येत विषप्राशन केले. यामध्ये या महिलेचा प्रियकर असलेल्या दिराचा मृत्यू झाला. तर ही महिला मृत्यूशी लढा देत आहे.

नालंदा जिल्ह्यातील हरनौत पोलीस ठाणे क्षेत्रातील हरनौत रेल्वे स्टेशनवर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दीर आणि त्याच्या वहिनीने विषप्राशन केले. विषप्राशन केल्यानंतर दीर कुंदन कुमार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या वहिनीची प्रकृती गंभीर आहे. हरनौत येथील चक जेनाब गावातील बिंदेश्वरी यादव यांचा पुत्र राकेश कुमार याचा विवाह एक वर्षापूर्वी रहुईमधील अम्बा गावातील रहिवासी शबनम कुमारी हिच्याशी झाला होता. विवाहानंतर शबनमचा पती जेव्हा दिल्लीला गेला तेव्हा तिच्यात आणि तिच्या दिरामध्ये जवळीक निर्माण झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यातूनच ते घर सोडून पळून गेले.

दीड महिन्यांपूर्वी गाव सोडून गेलेले हे युगुल काही दिवसांपूर्वी हरनौत येथील रेल्वे स्टेशनवर परत आले. तिथे त्यांनी एकत्रच विषप्राशन केले. त्यात कुंदन याचा मृत्यू झाला. तर त्याची वहिनी असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या प्रकाराची कल्पना दोघांच्याही कुटुंबाला देण्यात आली आहे. एएसआय वीर बहादूर यांनी सांगितले की, एका जोडप्याने विषप्राशन केल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली. त्यानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. तर महिलेची प्रकृती गंभीर आहे.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी