मुंबई : भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढणा-या रोडरोमियोंना जाब विचारणाºया वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार सायनमध्ये घडला. या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपू मंडल याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.सायन परिसरात १० वर्षीय नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून येता-जाताना मंडल तिला पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. तिने त्याला यापूर्वीही वारंवार बजावले होते. तरीदेखील तो तिचा पाठलाग करत छेड काढत असे. शनिवारी त्याने भररस्त्यात तिची छेड काढली. मंडलचा त्रास वाढत असल्याने नेहाने याबाबत वडिलांना सांगितले.वडिलांनी याबाबत मंडलला जाब विचारला. याच रागात त्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यातूनच मंडलने मुलीच्या वडिलांना मारहाण सुरू केली व त्यांच्या पायावर धारदार शस्त्राने वार केले. तेथे स्थानिक जमताहेत हे पाहून मंडलने पळ काढला.तेथे जमलेल्या लोकांनी मुलीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केले व रात्री सायन पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी शनिवारी रात्री उशिराने मंडलविरुद्ध विनयभंग, पॉक्सो, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सायनमध्ये भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड! जाब विचारणाऱ्या वडिलांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 01:30 IST