शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पानिपतचा सिंघम वैतागला! गुन्हेगारांना पकडायचा, पोलीस सोडायचे; राजीनामा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 20:54 IST

या प्रकरणावर हरियाणाचा एकही बडा पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाहीय़. हेडकॉन्स्टेबल आशिष आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असायचे.

हरियाणाच्या पानिपतमध्ये सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेला पोलीस दलातील हेड कॉन्सेबल पोलिसांच्या खाऊगिरीला वैतागला आहे. पोलिसांच्या कार्यशैलीवर नाराज झाल्याने त्याने नोकरीचा राजीनामा पोलीस अधिक्षकांकडे दिला आहे. पोलीस आणि गुन्हेगारांची मिलीभगत आहे. तो गुन्हेगारांना पकडून आणत होता, पोलीस त्यांना सोडून देत होते. अशा वातावरणात पोलीस खात्यात नोकरी करणे शक्य नाहीय, असे कारण त्याने राजीनाम्यात दिले आहे. 

आशिष हे हरियाणात सिंघम म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पानिपतमध्ये वाहतूक शाखेत हेड कॉन्स्टेबल या पदावर तैनात होते. त्यांनी जिल्हा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी मी सट्टेबाजांना पकडले होते. त्यापूर्वी ड्रगच्या तस्करांना पकडले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना चिरीमिरी घेऊन सोडून दिले. जिल्ह्यात नशेबाजी, तस्करी, सट्टेबाजी सारखे गुन्हे पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरु आहेत. यामुळे मी राजीनामा देत असल्याचे आशिष यांनी म्हटले आहे. 

या प्रकरणावर हरियाणाचा एकही बडा पोलीस अधिकारी बोलण्यास तयार नाहीय़. हेडकॉन्स्टेबल आशिष आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असायचे. पानिपतचे लोक आशिषना सिंघम म्हणतात. आशिष उर्फ ​​सिंघमने अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सट्टेबाज आणि ड्रग्ज तस्करांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. आशिष राजीनामा घेऊन मिनी सचिवालयातील एसपी कार्यालयात पोहोचले तेव्हा सचिवालयात उपस्थित कर्मचारी आणि लोक आश्चर्यचकित झाले होते. 

भाजपचे पानिपतमधील आमदार प्रमोद विजय म्हणाले की, आशिष चांगले काम करत आहेत. या प्रकरणाबद्दल नुकतीच मला माहिती मिळाली आहे. आशिष माझ्याकडे आले तर त्यांचे म्हणणे नक्कीच ऐकून घेतले जाणार आहे. त्यांच्या आरोपांची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Policeपोलिस